Cristiano Ronaldo | रोनाल्डोच्या हॅट्‌ट्रिकमुळे मँचेस्टर युनायटेडची सरशी; नॉर्विच सिटीवर ३-२ने केली मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo

रोनाल्डोच्या हॅट्‌ट्रिकमुळे मँचेस्टर युनायटेडची सरशी; नॉर्विच सिटीवर ३-२ने केली मात

स्ट्रॅटफोर्ड : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ५०व्या क्लब कारकिर्दीच्याच हॅट््ट्रिकमुळे येथे चाहत्यांच्या निषेधाच्या दृश्यांमध्ये शनिवारी मँचेस्टर युनायटेडने नॉर्विच सिटीवर ३-२ असा प्रीमियर लीग विजय मिळवला. टोटेनहॅम हॉटस्परने शनिवारी घरच्या मैदानावर ब्राइटनकडून १-० असा, तर तत्पूर्वी, होव्ह अल्बियनकडून पराभव पत्करल्यानंतर, युनायटेडला चॅम्पियन्स लीग पात्रता फेरीच्या गुणतालिकेत तळाशी असलेल्या नॉर्विचवर विजय मिळवून शेवट गोड करण्याची संधी होती आणि युनायटेडनेही मिळालेल्‍या या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.(Cristiano Ronaldo News)

हेही वाचा: CSK vs GT : गुजरातचा 'प्रभारी' कॅप्टन ठरला हिरो

पहिल्या सत्राच्या स्टॉपेज वेळेत किरन डोवेलच्या(४५ वा. मि.) गोलने पाहुण्या नॉर्विचला स्पर्धेत परतवले. त्यानंतर फॉरवर्ड तेमू पुक्कीने नॉर्विचचे सामन्यात पुनरागमन करण्यासाठी ५२ व्या मिनिटाला गोल केला; परंतु रोनाल्डो आज वेगळ्याच तोऱ्यात होता. त्याने सामन्याच्या सुरुवातीच्या ७ व्या मिनिटातच पहिला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ३२ व्या व अखेरीस ७६ मिनिटाला त्याने गोलची हॅट््ट्रिक करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.

हेही वाचा: CSK vs GT : गुजरातचा मिलर ठरला किलर; सीएसकेचा जॉर्डन व्हिलन

सामन्याच्या आधी चाहते क्लबच्या मालकांचा निषेध करताना ‘तुम्ही संघाचा शर्ट घालण्यास योग्य नाही’ असे गाताना दिसत होते. कारण त्यांचा संघ लीगच्या पात्रता मिळविण्यासाठी अजूनही पाचव्या क्रमांकावर आहे. नॉर्विचवरील विजयासह युनायटेड ३२ सामन्यांतून ५४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे नॉर्विच २१ गुणांवर तळाशी आहे.

Web Title: Cristiano Ronaldo Scored His Second Hat Trick In Three Premier League Football Games

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top