इन्स्टाचा बादशहा; रोनाल्डोचा 300 मिलियन फॉलोअर्सचा विक्रम

अमेरिकन WWE रॉक स्टार ड्वेन जॉनसन याचे इन्स्टाग्रामवर 246 मिलीयन फॉलोअर्स आहेत. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo File Photo

फुटबॉलच्या मैदानात आपल्या खेळीने नव नवे विक्रम प्रस्थापित करणारा पोर्तुगाल फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानाबाहेरही चांगलाच चर्चेत असतो. जगभरात त्याचा माठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांच्या पसंतीस उतरणाऱ्या रोनाल्डोच्या नावे आता आणखी एक रेकॉर्डची नोंद झालीये. इन्स्टाग्रामवर त्याच्या फोलोअर्सचा आकडा हा 300 मिलियनच्या घरात पोहचलाय. इन्स्टाग्रामवर एवढ्या मोठ्या प्रमाणात फोलोवर्स असणारा तो जगातील एकमेवर व्यक्ती आहे. अमेरिकन WWE रॉक स्टार ड्वेन जॉनसन याचे इन्स्टाग्रामवर 246 मिलीयन फॉलोअर्स आहेत. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Cristiano Ronaldo scripts history, becomes first person to reach 300 million followers mark on Instagram)

क्रीडा जगतातील लोकप्रिय रोनाल्डोने व्यावसायिक फुटबॉलमध्ये एन्ट्री केल्यापासून तो वेगवेगळ्या क्लबकडून खेळताना दिसले. मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद यासारख्या प्रतिष्ठित क्लबकडून खेळताना त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मैदानातील दमदार कामगिरीसह त्याच्या चाहत्यात दिवसागणिक वाढ होताना दिसली. क्लबकडून अनेक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या रोनाल्डोने पोर्तुगाल संघाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतानाही काही खास विक्रम आपल्या नावे केले आहेत.

Cristiano Ronaldo
Euro चा हिरो! सलामीच्या लढतीत रोनाल्डोचा विक्रमी गोल

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तिंमध्ये रोनाल्डो हा टॉपला आहे. मार्च 2019 ते मार्च 2020 या कालावधीत रोनाल्डोने स्पॉन्सर पोस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कमाई केलीये. रोनाल्डोने 50.3 मिलियन डॉलर इतकी कमाई इन्स्टाग्रामच्या माध्यामातून केलीये. ही रक्कम सध्याचा त्याचा क्लब युवेंट्सने त्याला वेतन स्वरुपात दिल्या जाणाऱ्या 33 मिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो हा आघाडीवर आहे. 2021 मध्ये त्याने 120 मिलियन डॉलर इतकी कमाई केली. पोर्तुगाल स्टार युवेंट्स क्लबसोबत 4 वर्षांसाठी करारबद्ध झाला. या क्लबकडून त्याला 64 मिलियन डॉलर प्रतिवर्ष मिळतात. फुलबॉलमधून मिळणारी सॅलरी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न याच्याशिवाय त्याला अन्य काही ब्रँड्सकडून मोठी रक्कम मिळते.

Cristiano Ronaldo
Euro : इटलीचा हल्लाबोल! दुसऱ्या सामन्यातही ट्रिपल धमाका

युरो स्पर्धेतील पोर्तुगालचे नेतृत्व करणाऱ्या रोनाल्डोने पहिल्या सामन्यात कमालीची कामगिरी करत दोन गोल डागले होते. या कामगिरीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. युरोमध्ये आणखी काही खास विक्रम त्याला खुणावत आहेत. स्पर्धेत गतविजेता पोर्तुगाल हा प्रबळ दावेदार असणाऱ्या संघांपैकी एक असून रोनाल्डोसाठी ही स्पर्धा खास अशीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com