Video : धोनीला पाहताच काश्मिरात लोकांच्या 'बूम बूम आफ्रिदी'च्या घोषणा

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय लष्करासह
काश्मीर खोऱ्यात तैनात आहे. यावेळी धोनीला अत्यंत खारब अनुभव आला आहे. बारामुल्ला येथे जमावाने त्याला पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार बूम बूम आफ्रिदी अशा घोषणा दिल्या आहेत. 

बारामुल्ला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय लष्करासह
काश्मीर खोऱ्यात तैनात आहे. यावेळी धोनीला अत्यंत खारब अनुभव आला आहे. बारामुल्ला येथे जमावाने त्याला पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार बूम बूम आफ्रिदी अशा घोषणा दिल्या आहेत. 

काश्मीर खोऱ्यात रहाणारे नागरिक भारतीय लष्कराशी नीट वागत नाहीत आणि याचाच प्रत्यय धोनीला नुकताच आला. तो बारामुल्ला येथे आला असताना शंभरहून अधिक स्थानिक लोकं त्याला पाहण्यासाठी तेथे जमले होते. मात्र, त्याला पाहताच जमावाने बूम बूम आफ्रिदीच्या घोषणा दिल्या. 

क्रिकेटमधून दोन महिन्यांची सुटी घेत धोनी सध्या निम लष्करी दलात कार्यरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd Chants Boom Boom Afridi After Seeing MS Dhoni In Baramulla