श्रेयसीने भारताला मिळवून दिले आणखी एक सुवर्ण

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे. राष्ट्रकुलमधील भारताचे हे 12 सुवर्णपदक आहे. भारताला आतापर्यंत 23 पदके मिळाली आहेत. यामध्ये 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 ब्राँझपदके आहेत. पदक तालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजांची सुवर्ण कामगिरी सुरुच असून, आज (बुधवार) श्रेयसी सिंग हिने डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळविले.

आज सकाळी श्रेयसीने सुवर्ण मिळविण्यापूर्वी 50 मीटर एअर पिस्तुल प्रकारात ओम मिथरवालने ब्राँझ पदक मिळविले. जितु राय या प्रकारात पदक मिळविण्यात अपयशी ठरला. श्रेयसीने 96+2 गुण मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर, ऑस्ट्रेलियाच्या  एम्मा कॉक्सने रौप्य आणि स्कॉटलंडच्या लिंडा पियरसनने ब्राँझपदक मिळविले.

भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे. राष्ट्रकुलमधील भारताचे हे 12 सुवर्णपदक आहे. भारताला आतापर्यंत 23 पदके मिळाली आहेत. यामध्ये 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 ब्राँझपदके आहेत. पदक तालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: cwg 2018 shreyasi singh win the gold medal in womens double trap finals