अकोल्याच्या नळकांडेचे आयपीएलमध्ये होणार ‘दर्शन’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

अकोला - इंडियन प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी झाला. या लिलावाकडे अकोलेकरांचे खास लक्ष होते. अकोल्यातील दोन खेळाडू या लिलावात होते. त्यापैकी दर्शन नळकांडेला किंग्ज इलेव्हन पंजाबने पसंती दिली आहे, तेही षटकार किंग म्हणून अोळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगच्या जागी. विदर्भातील क्रिकेटसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. 

आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी देश-विदेशातील खेळाडू उत्सूक असतात. ही स्पर्धा अनेक युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडून देणारी ठरली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता असते. विशेषतः विदर्भातील जे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर नेहमीच उपेक्षित राहिले आहेत, त्यांच्यासाठी तर आयपीएल पर्वणीच ठरते. त्यातही अकोल्यासारख्या शहरातील क्रिकेटपटूची या स्पर्धेत एखाद्या संघात निवड होणे म्हणजे हिमालय चढून जाण्यासारखीच कामगिरी आहे. हे भाग्य मिळाले ते अकोल्याचा २१ वर्षीय नवोदित अष्टपैलू खेळाडू दर्शन नळकांडेला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने यावर्षी युवराज सिंगला नापसंती दिली. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले. युवराज सिंगच्या जागी पंजाब संघाने विदर्भाच्या युवा खेळाडूला पसंती दिली. लिलावात असलेला दुसरा अकोलेकर क्रिकेटपटू अर्थव तायडेचा पहिल्या दिवशी लिलावात नंबर लागला नाही. 

३० लाखांचे मूल्य
अकोलेकर क्रिकेटपटू दर्शन नळकांडेला आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने लिलावात ३० लाखांचे मूल्य दिले आहे. त्याची बेस प्राईस २० लाख ठेवण्यात आली होती. लिलाव सुरू असताना या अष्टपैलू खेळाडूला १० लाख वाढवून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने खरेदी केले.

Web Title: Darshan Nalankande has preferred Kings XI Punjab in IPL