
David Warner : बुडत्याचा पाय खोलात! कर्णधारानंतर आता ऑस्ट्रेलियाचा हा धाकड खेळाडू मायदेशात परतणार
David Warner IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचे पहिले दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. आधीत पराभवाच्या खाईत लाटलेल्या ऑस्ट्रेलियाचे एका पाठोपाठ एक दिग्गज खेळाडू संघ सोडून मायदेशी परतत आहेत. कर्णधार पॅट कमिन्स पाठोपाठ आता सलामीवीर डेव्हिड वॉर्नर देखील उर्वरित मालिकेला मुकला असून मायदेशात परतरणार आहे.
दिल्ली येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाचा धाडक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर बाऊन्सरचा मारा करत त्याला हैराण केले होते. याचदरम्यान सिराजचा एक चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या हेलमेटला लागला होता. यानंतर थोड्याच वेळात दुसरा चेंडू वॉर्नरच्या कोपला लागला.
वॉर्नरच्या कोपराला लागलेल्या चेंडूमुळे डेव्हिड वॉर्नरच्या कोपराला हेअर लाईन फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तो आता पुढच्या सर्व कसोटी सामन्यांना मुकणार आहे.
वॉर्नर तसाही पहिल्या दोन कसोटीत ऑऊट ऑफ फॉर्म दिसला. त्याला तीन डावात मिळून फक्त 26 धावा करता आल्या आहेत. दिल्ली कसोटीत त्याच्या ऐवजी मॅथ्यू रेनशॉला बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली होती. वॉर्नर आता इंदौर आणि अहमदाबाद कसोटीला मुकणार आहे. तो दुखापतीनंतर मायदेशी परतणार आहे. मात्र भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी तो भारतात पुन्हा येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!