डेव्हिड वॉर्नरने हैदराबादच्या कर्णधार पदाचा दिला राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

नवी दिल्ली : बॉल टेंम्परिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा दोषी खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने भारतात होणाऱ्या आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. हे वृत्त सनरायझर्स हैदराबादच्या ट्विटर अकाऊंटवरून जाहिर करण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, कॅमेरुन बँक्रॉफ्ट व डेव्हिड वॉर्नर तीन खेळाडूंना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
 
हैदराबादच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शंगमुगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता वॉर्नरने हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा लवकरच केली जाईल. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग केले. याची आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. बॉल टॅम्परिंग प्रकरणातील दोषींना येत्या 24 तासात शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यानंतर या दोघांच्या आयपीएलमधील सहभागाबाबत निर्णय होऊ शकतो.

Web Title: David Warner steps down as captain of Sunrisers Hyderabad