क्रोएशियाला हरवून अर्जेंटिना विजेता

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

झाग्रेब - यजमान सर्बियाला ३-२ असे हरवून अर्जेंटिनाने डेव्हिस जागतिक करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. प्रतिष्ठेचा डेव्हिस करंडक अर्जेंटिनाने प्रथमच जिंकला. सलामीच्या एकेरीतील १-१ अशा बरोबरीनंतर सर्बियाने दुहेरीचा सामना जिंकून २-१ अशी आघाडी घेतली होती; पण अर्जेंटिनाने परतीच्या एकेरीचे दोन्ही सामने जिंकून पारडे फिरविले.

पहिल्या सामन्यात जुआन मार्टिन डेल पोट्रो याने मरिन चिलीचविरुद्ध पहिले दोन सेट हरल्यानंतर पाच सेटमध्ये बाजी मारली. त्यानंतर इव्हो कार्लोविचला फेडेरिको डेल्बोनीस याने तीन सेटमध्येच हरविले. डेल्बोनीस जिंकता झाग्रेब एरिना स्टेडियमवर अर्जेंटिनाच्या खेळाडू; तसेच समर्थकांनी एकच जल्लोष केला. यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचा समावेश होता.

चिलीच आणि डेल पोट्रो यांच्यातील लढत महत्त्वाची होती. चिलीचने टायब्रेक जिंकला; मग दुसऱ्या सेटमध्येही त्याने सफाईदार खेळ केला. तिसऱ्या सेटमध्ये डेल पोट्रोने दोन पायांमधून शॉट मारत प्रतिआक्रमण सुरू केले. चौथ्या सेटमध्ये त्याने नवव्या गेममध्ये ब्रेक मिळविला. पाचव्या सेटमध्ये पिछाडीवर पडूनही त्याने बाजी मारली. हा सामना चार तास ५३ मिनिटे चालला.

डेल्बोनीससमोर कार्लोविचच्या झंझावाती सर्व्हिसचे आव्हान होते; पण त्याने बेसलाइनवरून भेदक फटके मारत ते बोथट ठरविले.

अर्जेंटिनाचे प्रशिक्षक डॅनिएल ऑर्सेनिक यांच्यासाठी हे यश भावपूर्ण ठरले. ते मूळचे क्रोएशियन वंशाचे आहेत. त्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले; पण डेल पोट्रोच्या पराक्रमाचा खास उल्लेख केला. ‘डेल पोट्रो अत्यंत अभिमानाने देशाचे प्रतिनिधित्व करतो. आपण किती चांगला खेळाडू आहोत हे त्याने दाखवून दिले.’

Web Title: Davis Cup - Argentina beat