भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संयमी खेळ; 6 बाद 237 धावा

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

बंगळूर - दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सहा बाद 237 धावा केल्या आहेत.

बंगळूर - दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सहा बाद 237 धावा केल्या आहेत.

पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांसमोर नांगी टाकल्याचे पहायला मिळाले. नॅथन लिऑनने 8 बळी घेत भारताला पहिला डावात केवळ 189 धावांत थांबविले. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुलने सर्वाधिक 90 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने संयमी खेळाचे प्रदर्शन केले. शॉन मार्शने 197 चेंडूत 66 धावांची खेळी केली. तर मॅट रॅनशॉने 196 चेंडूत 60 धावा केल्या. आज खेळ थांबला तेव्हा मॅथ्यू वेड (68 चेंडूत 25 धावा) आणि मिशेल स्टार्क (19 चेंडूत 14 धावा खेळत) होते.

भारताच्या वतीने रवींद्र जडेजाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तीन बळी घेतले. तर, इशांत शर्मा, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्‍विन यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला 48 धावांची आघाडी मिळाली आहे.

Web Title: Day 2 - Ind vs Australia - Australia leads 48 runs