हृदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

ऐरोली - क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) घणसोलीत घडली. संदीप म्हात्रे (३६) असे या क्रिकेटपटूचे नाव असून याबाबत अनेकांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. 

रविवारी एका स्थानिक स्पर्धेत खेळताना संदीपला तीव्र हृदयविकाराचा झटाका आल्याने त्याच्या छातीत दुखू लागले. यावेळी तो जागीच कोसळला. त्याला वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

संदीप अविवाहित होता. स्थानिक पातळीवर तो अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध होता. त्याने १५ व्या वर्षापासून शालेय क्रिकेट स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. २००० मध्ये झालेल्या ‘नवी मुंबई  महापौर चषक’ क्रिकेट स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीची  चर्चा होती.

गोव्यातही क्रिकेटपटूचा मृत्‍यू 
मडगाव - मैदानावर खेळत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने माजी रणजीपटू राजेश घोडगे (४४) याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेश याच्यावर सोमवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. आयुष्य क्रिकेटला समर्पित केलेल्या या अष्टपैलू क्रिकेटपटूस मैदानावर मानवंदना देऊन अखेरचा निरोप देण्यात आला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of cricketer by heart attack