दीपक चहरची कमाल, तीन दिवसांत घेतली दुसरी हॅटट्रीक!

Deepak Chahar takes hat trick in Syed Mushtaq Ali Trophy 2019
Deepak Chahar takes hat trick in Syed Mushtaq Ali Trophy 2019

तिरुवनंतपुरम : बांगलादेशाविरुद्धच्या अखेरच्या टी 20 सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने दोनच दिवसांनी मंगळवारी सईद मुश्‍ताक अली टी 20 सामन्यात विदर्भाविरुद्ध दुसरी हॅटट्रिक साजरी केली. या वेळी त्याने नुसती हॅटट्रिकच साजरी केली नाही, तर एका षटकात चार फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली. त्याने 18 धावांत चार फलंदाजांना बाद केले. 

रोहित शर्मा आता कसोटी नीट खेळ, 'तो' परत येतोय

विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे हा सामना 13 षटकांचा करण्यात आला. पण, त्यांचा डाव कधीच स्थिरावला नाही. 12 षटकांत त्यांनी 5 बाद 93 अशी मजल मारली होती.

मात्र, अखेरच्या षटकार चहरने पुन्हा एकदा कहर केला. त्याने पहिल्या चेंडूवर विदर्भाच्या रुषभ राठोडला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या चेंडूंवर धावा निघाल्यावर चौथ्या चेंडूवर त्याने दर्शन नळकांडेचा बाद केले, त्यानंतर पाचव्या चेंडूला त्याने श्रीकांत वाघची विकेट मिळविली आणि अखेरच्या चेंडूवर अक्षय वाडकरचा त्रिफळा उडविला. त्यामुळे विदर्भाला 13 षटकांत 9 बाद 99 धावांवरच समाधान मानावे लागले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com