Deepak Hooda | इकडे बुमराह तिकडे हुड्डा! सामना जिंकून देणारी केली खेळी

Deepak Hooda Match Winning Inning In T20 Practice Match Against Derbyshire
Deepak Hooda Match Winning Inning In T20 Practice Match Against Derbyshireesakal

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) धडाकेबाज फलंदाजी करत स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीतही भेदक मारा करत इंग्लंडला पाठोपाठ दोन धक्के दिले. इकडे कसोटीत जसप्रीत बुमराह दमदार कामगिरी करत असतानाच तिकडे भारत आणि डर्बीशायर यांच्यातील सराव सामन्यात दीपक हुड्डाने (Deepak Hooda) मॅच विनिंग इनिंग खेळली. त्याने 37 चेंडूत 59 धावा केल्या.

Deepak Hooda Match Winning Inning In T20 Practice Match Against Derbyshire
Maharashtra Wrestling | खेळात राजकीय हस्तक्षेप नको; पवारांचे मत

आयर्लंडमध्ये झालेल्या टी 20 सामन्यात (T20) दमदार शतक झळकावणाऱ्या दीपक हुड्डाने इंग्लंडमध्ये देखील आपला हा फॉर्म कायम राखला आहे. त्याने डर्बीशायर (Derbyshire) विरूद्धच्या टी 20 सराव सामन्यात (Practice Match) दमदार फलंदाजी केली. त्याने सूर्यकुमार यादवबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचत 151 धावांचे आव्हान 20 चेंडू शिल्लक ठेऊन पार केले. सूर्यकुमार यादवने नाबाद 36 धावा केल्या.

दीपक हुड्डाने आपल्या डावात पाच चौकार आणि दोन षटकार मारले. तर सूर्यकुमारने चार चौकार आणि एक षटकार मारत आक्रमक 36 धावा केल्या. सलामीवीर संजू सॅमसनने देकील 30 चेंडूत 38 धावांची खेळी केली. तर कर्णधार दिनेश कार्तिक सात धावा करून नाबाद राहिला.

Deepak Hooda Match Winning Inning In T20 Practice Match Against Derbyshire
PHOTO: 'कर्णधार' बुमराहचा दणका; पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम

प्रथम फलंदाजी करणाऱ्या डर्बीशायरला भाराताने 151 धावात रोखले. वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. डर्बीशायरने 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या. अक्षर पटेल आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com