
IPL 2021 : सिराजने दूर केलं 'विराट' टेन्शन!
Delhi vs Bangalore, 22nd Match : कर्णधार रिषभ पंत 58 (48) आणि कॅरेबियन हेटमायर 53 (25) धावांची नाबाद अर्धशतकी व्यर्थ ठरली. सिराजने अखेरच्या षटकात कर्णधार विराट कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला. अखेरच्या चेंडूवर 6 धावांची गरज असताना सिराजने हुशारीनं ऑफ साइड वाइड चेंडू फेकत रिषभ पंतला केवळ चार धावा मिळाल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 1 धावाने विजय मिळाला. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन 7 चेंडूत 6 धावा करुन माघारी फिरला. जेमिसनने चहलकरवी त्याला झेलबाद केले. मोहम्मद सिराजने स्मिथला फार काळ टिकू दिले नाही. त्याने 4 धावा केल्या. हर्षल पटेलने पृथ्वी शॉच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का दिला. पृथ्वीने 18 चेंडूत 21 धावा केल्या. हर्षल पटेलने मार्कस स्टॉयनिसला 22 धावांवर बाद केले. पंत आणि हेटमायरने संघाला तारले. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.
हेही वाचा: IPL Record: 360 डिग्री एबी ठरला 'फास्टर फॉरेनर'
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार विराट कोहली 12 (11), देवदत्त पदिक्कल 17 (14) आणि मॅक्सवेल 20 (25) धावा करुन परतले. चांगली सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी एबी डिव्हिलियर्ससमोर खांदे टाकले. एबीने रजत पाटीदारच्या साथीने 54 धावांची भागीदारी केली. पाटीदार 22 चेंडूत 31 धावा करुन परतल्यानंतर एबीने 42 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 75 धावांची खेळी करुन परतला. त्याच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा केल्या होत्या.
हेही वाचा: IPL 2021 : परदेशी खेळाडू आमची जबाबदारी; BCCI चे भावनिक पत्र
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पराभूत करत विराट कोहलीच्या आरसीबने पाँइंट टेबलमध्ये अव्वलस्थानी मजल मारली आहे. 6 सामन्यातील पाच विजयासह त्यांच्या खात्यात आता 10 गुण जमा आहेत. चेन्नई सुपर किंग्ज या यादीत दुसऱ्या क्रमांकवर आहे. धोनीच्या संघाने 5 सामन्यात 4 विजयासह 8 गुण मिळवले आहेत. दिल्ली कॅपिटल्स 6 सामन्यातील 4 विजयासह 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून मुंबई इंडियन्स 5 सामन्यातील 2 विजयासह 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स 6 पैकी 2 विजयासह 4 गुणांसह अनुक्रमे पाचव्या सहाव्या आणि सातव्या स्थानावर असून सनरायझर्स हैदराबादचा संघ 5 सामन्यातील एका विजयासह तळाला आहे.
Web Title: Delhi Capitals Pant And Hetmyer Fight But Royal Challengers Bangalore Won By 1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..