पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्साचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 25 मार्च 2019

मुंबई इंडियन्सला वानखेडेवर पराभूत करणे तसे अवघडच. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या पठ्ठ्यांनी हीच किमया करुन दाखवली. दिल्लीने मुंबईला त्यांच्यात घरच्या मैदानावर 37 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने यंदाच्या मोसमातील पहिली द्विशतकी धावसंख्या नोंदविली. पंतच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर त्यांनी मुंबईसमोर 214 धावांचे आव्हान ठेवले. 

आयपीएल 2019 : मुंबई : मुंबई इंडियन्सला वानखेडेवर पराभूत करणे तसे अवघडच. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या पठ्ठ्यांनी हीच किमया करुन दाखवली. दिल्लीने मुंबईला त्यांच्यात घरच्या मैदानावर 37 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने यंदाच्या मोसमातील पहिली द्विशतकी धावसंख्या नोंदविली. पंतच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर त्यांनी मुंबईसमोर 214 धावांचे आव्हान ठेवले. 

दिल्लीने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने ठराविक अंतराने फलंदाज गमावले आणि विजय त्यांच्यापासून दूर गेला. रोहित शर्मा 14 धावांवर बाद झाल्यावर लगेच सहाव्या षटकात क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव बाद झाले. 

यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवराजने संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवला. समोरुन सर्व फलंदाज बाद होत असताना त्याने एकबाजून लढत देणे सुरु ठेवले. कृणाल पंड्या आणि त्याची जोडी चांगली जमली होती. मात्र, कृणाल 32 धावा करुन बाद झाला. दरम्यान युवीने आपले अर्धशतक साजरे केले मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi capitals wins against Mumbai Indians