
सुशील कुमारनं पोलिसांना दिला चकवा, अटक झाल्याची पसरली अफवा
दोनवेळा ऑलिम्पिक पदक पटकवणारा पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) सध्या मोस्ट वाँटेडच्या यादीत आलाय. ज्यूनियर स्तरावरील पैलवान सागर धनखडच्या हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिस त्याच्या माघावर आहेत. दिल्ली पोलिसांच्या 15 तुकड्या पंजाबच्या वेगवेगळ्या भागात सुशील कुमारचा शोध घेत आहेत. सुशील कुमारच्या मोबाईल ट्रेस करुन तो भडिंडा-मोहाली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दिल्ली पोलिस आणि स्थानिक पोलिस एकत्रितपणे त्याचा या भागात शोध घेत आहेत. मोहालीतील एका ठिकाणी सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय सहावरत लपून बसल्याची माहिती पोलिसांना शनिवारी मिळाली होती. पोलिस टिम ज्यावेळी त्याठिकाणी पोहचली त्यावेळी दोघेही तेथून पसार झाले होते.
हेही वाचा: Wrestler Murder Case : सुशील कुमार विरोधात लूकआउट नोटिस
हा सर्व प्रकार घडत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर पंजाब पोलिसांनी सुशील कुमारला ताब्यात घेतले असून ते लवकरच त्याला दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र ही बातमी अफवा असल्याचे समोर आले आहे. सुशील कुमार सध्या जे सीम कार्ड वापरत आहे ते भटिंडातील सुखप्रीत सिंह यांच्या नावावर आहे. शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. सुखप्रीतने मामे भावाच्या मदतीने हे सीम कार्ड सुशील कुमारपर्यंत पोहचवल्याची माहिती समोर आली होती.
हेही वाचा: ऑलिम्पिकपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट
5 मे पासून सुशील कुमार पसार आहे. सागर धनखडच्या हत्यप्रकरणातील आरोपात पोलिस त्याचा शोध घेत असून 15 मे रोजी त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. सुशील कुमारती माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी 1 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली असून त्याचा साथीदार अजय याच्यावर 50 हजारचे बक्षीसाची घोषणा करण्यात आलीये.
Web Title: Delhi City Ncr Olympian Sushil Kumar And His Accomplice Arrested In The Wrestler Sagar Dhankhar Murder
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..