साईनाचा कॅरोलीनवर विजय 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

गेल्या महिन्यात जपान ओपनमध्ये साईनाला दोन गेममध्ये पराभूत व्हावे लागले होते. या निकालाची तिने परतफेड केली.

ओडेन्स : साईना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलीना मरीनला दोन गेममध्येच पराभूत केले. 46 मिनिटे चाललेला सामना तिने 22-20, 21-18 असा जिंकला.

गेल्या महिन्यात जपान ओपनमध्ये साईनाला दोन गेममध्ये पराभूत व्हावे लागले होते. या निकालाची तिने परतफेड केली. या दोघींत यापूर्वी 4-4 अशी बरोबरी होती. साईनाने पाचवा विजय मिळवित आघाडी घेतली. 
 

Web Title: Denmark Open Superseries Premier: Saina Nehwal dictated terms against Carolina Marin