ड्रॉ नीट बघितलाही नव्हता: साईना

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

सिंधूचा सलामीला पराभव 
साईना सुखद धक्का देत असताना सिंधूला पहिल्याच फेरीत चीनच्या चेन युफेईविरुद्ध 17-21, 21-23 अशी हार पत्करावी लागली. सिंधूचा चेनविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे. जपान ओपन स्पर्धेत चेनने सिंधूला हरवले होते. खेळात सातत्य नसल्यामुळे सिंधूला हार पत्करावी लागली. पुरुष एकेरीतही फारसे काही हाती लागले नाही. अजय जयराम; तसेच समीर वर्मा यांनी माघार घेतल्याचे ड्रॉ दाखवत आहे. बी. साईप्रणीत; तसेच शुभंकर डे पहिल्याच फेरीत पराभूत झाले.

मुंबई : सलामीला कॅरोलिना मरीन प्रतिस्पर्धी होती. या लढतीत काहीही घडू शकते, त्यामुळे डेन्मार्क ओपन स्पर्धेचा ड्रॉ नीट बघितलेलाही नाही, असे साईना नेहवालने सांगितले. साईनाने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिन मरीनला हरवले; पण पी. व्ही. सिंधू या स्पर्धेत सलामीलाच पराजित झाली. 

मरीन आणि साईनाची लढत कोणालाही पहिल्या फेरीत अपेक्षित नव्हती. साईनासही हे अपेक्षित नव्हते. पहिल्याच फेरीत खडतर आव्हान होते. पहिल्याच फेरीत कॅरोलिनाविरुद्ध लढत आहे, हे पाहिल्यावर मी बाकीच्या लढती काय होऊ शकतात, याकडे लक्षही दिले नाही, असे साईनाने सांगितले. तिने दोघीतील नववी लढत 22-20, 21-18 अशी जिंकली. 

पहिला गेम चुरशीचा झाला. प्रत्येक जिंकलेला गुण प्रतिस्पर्धींना सुखावत होता. या पंचवीस मिनिटांच्या गेममध्ये निर्णायक टप्प्यात साईनाचा खेळ बहरला. दुसऱ्या गेममध्ये मरीनच्या वेगवान सुरुवातीने साईनाला धक्का दिला; पण यातून सावरत साईनाने ब्रेकला 11-8 आघाडी घेतली आणि ती पाहता पाहता 19-14 वाढवत विजय निश्‍चित केला. 

आज सुखद धक्के खूप बसले. आज कोर्टवरील हालचाली चांगल्या झाल्या. काही अवघड वाटणारे शॉट्‌सही सहज खेळले. मरीनला कोर्टवर सतत हालचाल करण्यास भाग पाडले. अर्थात, ही केवळ सुरवात असल्याची मला जाणीव आहे, असे साईनाने सांगितले. 

सिंधूचा सलामीला पराभव 
साईना सुखद धक्का देत असताना सिंधूला पहिल्याच फेरीत चीनच्या चेन युफेईविरुद्ध 17-21, 21-23 अशी हार पत्करावी लागली. सिंधूचा चेनविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे. जपान ओपन स्पर्धेत चेनने सिंधूला हरवले होते. खेळात सातत्य नसल्यामुळे सिंधूला हार पत्करावी लागली. पुरुष एकेरीतही फारसे काही हाती लागले नाही. अजय जयराम; तसेच समीर वर्मा यांनी माघार घेतल्याचे ड्रॉ दाखवत आहे. बी. साईप्रणीत; तसेच शुभंकर डे पहिल्याच फेरीत पराभूत झाले.

Web Title: Denmark Open Superseries Premier: Saina Nehwal dictated terms against Carolina Marin