हॅट्ट्रिक घेणाऱ्या शमीवर अन्याय का? 

वृत्तसंस्था
रविवार, 23 जून 2019

भारताच्या विजयानंतर शमीऐवजी जसप्रीत बुमराला सामनावीर घोषित करण्यात आले. यावरुनच ट्विटरवर शमीबाबत सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे. बुमराची गोलंदाजी चांगलीच झाली. पण, भारताच्या विजयात शमीचा वाटा मोठा होता, असे फॅन्सचे म्हणणे आहे. तर, एकाने सचिन तेंडुलकरच्या ट्विटला रिप्लाय करत शमीला सामनावीर का नाही घोषित करण्यात आले याची कारणे विचारली आहेत.

साउदम्प्टन : भारतीय संघाला गरज असताना हॅट्ट्रिक घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मोहंमद शमीला सामनावीराचा किताब न देण्यात आल्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शमीवरच अन्याय का, असा या टीकेचा सूर आहे.

विश्‍वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत सफाईदार विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाचे शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात थोडक्‍यात निभावले. फलंदाजीतील संथपणा महागात पडण्याची भीती गोलंदाजांनी कमी केली आणि भारताने 11 धावांनी विजय मिळविला. वेगवान गोलंदाज महंमद शमी याने हॅट्ट्रिक मिळवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतील ही पहिलीच, तर भारताची विश्‍वकरंडक स्पर्धेतील दुसरी हॅट्ट्रिक ठरली. यापूर्व चेतन शर्मा यांनी 1987 च्या विश्वकरंडकात हॅट्ट्रिक मिळविली होती. तसेच, भारताचा हा विश्‍वकरंडक स्पर्धेतील पन्नासावा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला अफगाणिस्तानने 224 धावांवर रोखले. फलंदाजीतील हे अपयश गोलंदाजांनी धुवून टाकत अफगाणिस्तानला 49.5 चेंडूंत 213 धावांत रोखले.

भारताच्या विजयानंतर शमीऐवजी जसप्रीत बुमराला सामनावीर घोषित करण्यात आले. यावरुनच ट्विटरवर शमीबाबत सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे. बुमराची गोलंदाजी चांगलीच झाली. पण, भारताच्या विजयात शमीचा वाटा मोठा होता, असे फॅन्सचे म्हणणे आहे. तर, एकाने सचिन तेंडुलकरच्या ट्विटला रिप्लाय करत शमीला सामनावीर का नाही घोषित करण्यात आले याची कारणे विचारली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: despite Mohammed Shami hat-trick cricket fans questions as Jasprit Bumrah gets man of the match award