कारकीर्द उद्‌ध्वस्त केली - मिताली राज

पीटीआय
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागली. अधिकार असलेले काही जण माझी कारकीर्द उद्‌ध्वस्त करत आहेत, अशी थेट टीकाही केली.

महिला ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातून मितालीला वगळण्यात आले होते. मला अंतिम संघातून वगळण्यामागे एडल्जी यांचा हात होता; त्यांनी आपल्या अधिकाराचा अशा प्रकारे गैरवापर केला, असा थेट आरोप मितालीने करून आपले मौन सोडले.

२० वर्षांच्या इतक्‍या मोठ्या प्रदीर्घ कारकिर्दीत मी प्रथमच इतकी खिन्न आणि उदास झाले आहे. देशासाठी आपले योगदान पुढे सुरू ठेवायचे की नाही याचा मी विचार करत आहे. काही जणांना माझ्या गुणवत्तेची किंमतच नसेल तर विचार करणे भाग आहे, अशा शब्दांत नाराजी आणि राग मितालीने बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी, क्रिकेट व्यवहार व्यवस्थापक साबा करीम यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केला आहे. मला वगळण्याच्या प्रशिक्षकांच्या निर्णयाला पाठिंबा देणे हा अपवाद वगळता मी टी-२० कर्णधार हरमनप्रीतच्या विरोधात नाही. मला देशासाठी विश्‍वकरंडक जिंकून द्यायचा होता, परंतु ही सुवर्णसंधी हुकल्याची मोठी खंत आहे, अशी नाराजी मितालीने व्यक्त केली. 

एडल्जी यांच्यावर माझा विश्‍वास होता. प्रशासकीय समितीतील त्यांच्या पदाबाबत आदरही होता; परंतु त्या माझ्याविरुद्ध पदाचा आणि अधिकाराचा असा वापर करतील असे कधी वाटले नव्हते. वेस्ट इंडीजमध्ये जे घडले त्यामागे कोण असल्याचे जेव्हा कळले; त्यामुळे मला अशा प्रकारे व्यक्त होणे अपरिहार्य ठरले.
-मिताली राज

रमेश पोवारांवरही टीका
मितालीने प्रशिक्षक पोवारांनाही लक्ष्य करताना म्हटले आहे, इतर जणी नेटमध्ये फलंदाजी करताना ते बारकाईने लक्ष देत असत; पण मी फलंदाजी करत असताना ते एक तर मोबाईलमध्ये पहात असायचे किंवा आजूबाजूला जायचे, हा प्रकार माझ्यासाठी वेदनादायी होता; पण मी माझा संयम गमावला नव्हता.

Web Title: Destroying my career says Former Indian captain Mitali Raj