World Cup 2019 : धर्मसेनाने आजही माती खाल्ली; दोन वेळा चुकला

World Cup 2019 : धर्मसेनाने आजही माती खाल्ली; दोन वेळा चुकला

वर्ल्ड कप 2019 : ऐतिहासिक लॉर्डस्च्या मैदानावर सुरु असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या थरारक अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पहिले दोन फलंदाज गमावले अर्थात ते वोक्स आणि वूड यांनी बाद केले यापेक्षा DRS ने त्यांना बाद ठरवले असेच वर्णन करणे योग्य ठरणार आहे. मार्टिन गुप्तिल आणि केन विल्यम्सन या दोघांनाही बाद ठरवण्याबाबतचा निर्णय प्रामुख्याने धर्मसेना यांचा चुकला त्यामुळे DRS ला मध्यस्थी करावी लागली.

कुमार धर्मसेना यांनी वीरेंद्र सेहवाग समालोचन करताना धर्मसेना रिव्ह्यू सिस्टिम असे संबोधायचा. ते का ? हे आज पुन्हा सिद्ध झाले. यंदाच्या स्पर्धेत त्यांनी अगोदरही चुकीचे निर्णय दिलेले आहेत.

इंग्लंड-न्यूझीलंड या महामुकाबल्याची सुरुवातच DRS ने झाली.  मार्क निकल्स याला धर्मसेना यांनी बाद दिले होते परंतु त्याने DRS ला घेतला आणि तो वाचला. त्यानंतर मार्टिन गुप्तिलला धर्मसेना यांनी बाद ठरवले, त्यानेही DRS ला घेतला पण त्यांचा तो निर्णय बरोबर ठरला शेवटी DRS लाच मध्यस्थी करावी लागली..

न्यूझीलंडच्या डावातील सर्वात महत्वाचा फलदाज विल्यम्सन हा मार्क वूडच्या चेंडूवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला, परंतु धर्मसेना यांनी त्याला नाबाद ठरवले होते, इंग्लंडने DRS घेतला आणि त्यात तो बाद असल्याचे स्पष्ट झाले अशा प्रकारे धर्मसेना रिव्ह्यू सिस्टिम कार्यन्वित राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com