esakal | मुरली विजयला दुखापत; शिखर धवनला संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

Murli Vijay

भारतीय संघ : 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, रोहित शर्मा, आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद.

मुरली विजयला दुखापत; शिखर धवनला संधी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय याला आगामी श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. विजयच्या जागी शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. येत्या 26 जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरू होईल. 

मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये विजयच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यातून तो सावरलाही होता; पण आता ही दुखापत पुन्हा उफाळून आली आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी आयोजित केलेल्या सराव सामन्यामध्ये विजयने मनगटात पुन्हा वेदना होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर 'बीसीसीआय'ने केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्याला पुन्हा विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. 

अष्टपैलू हार्दिक पांड्याला प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. शिवाय, दुखापतीमुळे दीर्घकाळ कसोटीतून बाहेर राहिलेल्या रोहित शर्माचेही या दौऱ्यासाठी पुनरागमन झाले आहे. 

भारतीय संघ : 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, रोहित शर्मा, आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद.

loading image
go to top