बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतूनही धोनीची माघार?

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय लढती खेळण्याबाबतचा गूढ सातत्याने वाढवत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीपासून तो एकही सामना खेळलेला नाही आणि आता तो देशांतर्गत स्पर्धेत किंवा बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनुपलब्ध असेल, असे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय लढती खेळण्याबाबतचा गूढ सातत्याने वाढवत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीपासून तो एकही सामना खेळलेला नाही आणि आता तो देशांतर्गत स्पर्धेत किंवा बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनुपलब्ध असेल, असे सांगितले जात आहे.

धोनी बांगलादेशविरुद्ध खेळण्याची शक्‍यता कमी आहे. भारतीय क्रिकेट मंडळास उत्तेजक प्रतिबंधक संस्थेस खेळाडूंच्या सामन्यांची माहिती तयार करावी लागते. आता आगामी दीड महिन्याचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यात धोनीसमोर कोणताही सामना नाही, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा मंगळवारी सुरू होत आहे, त्यातही धोनी झारखंडकडून खेळणार नाही.

विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर आपण ब्रेक घेत असल्याचे धोनीने कळवले होते. त्यामुळे त्याला विंडीज दौऱ्यासाठी ब्रेक दिल्याचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले होते. आता आफ्रिकेविरुद्धच्या ट्‌वेंटी- 20 मालिकेसाठी त्याला संघाबाहेर ठेवण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते.

जोपर्यंत धोनी उपलब्ध आहे, तोपर्यंत तो संघाचा अविभाज्य घटक आहे, असे कोहलीने सांगितले होते, पण त्याचवेळी एखादा खेळाडू न खेळण्याचा निर्णय घेतो, त्यावेळी तो त्याचा वैयक्तिक असतो. त्याबाबत कोणीही मत व्यक्त करणे चुकीचेच असते, असेही कोहलीने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhoni may not play bangladesh series