एमसीए उपाध्यक्षपद वेंगसरकर यांनी सोडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्षपद दिलीप वेंगसरकर यांनी सोडले आहे. लोढा समितीच्या शिफारसीबाबत दिलेल्या निकालानुसार आपण राजीनामा देत असल्याचे वेंगसरकर यांनी एका ओळीच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

वेंगसरकर 2002 ते 2010 दरम्यान उपाध्यक्ष होते. ते सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष आहेत. 2011 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक गमावल्यानंतर चार वर्षांनी वेंगसरकर मुंबई संघटनेत परतले होते. ते निवड समितीचे माजी अध्यक्षही आहेत.
- मध्य प्रदेशचे माधवराव शिंदे, संजय जगदाळे यांचाही राजीनामा

Web Title: dilip vengsarkar resign mca dy. chairman post