दीपा कर्माकरचे सोनेरी पुनरागमन

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

शस्त्रक्रियेनंतर दीपा वॉकरच्या सहाय्याने चालू लागली. सर्वत्र तिची कारकीर्द संपल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. मात्र कठोर मेहनतीच्या जोरावर सर्व अडचणींवर मात करत  दीपाने रविवारी आपल्या कारकीर्दीतील पहिले सुवर्णपदक पटकावले. 

नवी दिल्ली : तब्ब्ल दोन वर्षे दुखापतीमुळे ब्रेक घेतलेल्या दीपा कर्माकरने जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुर्वण पदकाला गवसणी घातली आहे.

त्रिपुराच्या दीपाने 2014च्या राष्ट्रकुल आणि 2015च्या आशियाई करंडकात कांस्य पदक पटकावले होते. मात्र रिओ ऑलिम्पिकमधील बहारदार खेळीने तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. रिओ ऑलिम्पिकमध्ये काही गुणांच्या फरकाने दिपाचे पदक हुकले होते, मात्र तिने सुरेख खेळ करत लाखो भारतीयांची मनं जिंकली. 

आशियाई आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक्स स्पर्धेची तयारी करताना दीपाच्या गुडघ्याला दुखापत झाली. शस्त्रक्रियेनंतर दीपा वॉकरच्या सहाय्याने चालू लागली. सर्वत्र तिची कारकीर्द संपल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. मात्र कठोर मेहनतीच्या जोरावर सर्व अडचणींवर मात करत  दीपाने रविवारी आपल्या कारकीर्दीतील पहिले सुवर्णपदक पटकावले. 

 

दीपाने तुर्कस्तान येथे सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत दीपाने 14.150 गुणांची कमाई करत सुवर्ण पदक पटकावले. तिच्या या कामगिरीनंतर तिच्यावर विविध क्षेत्रांतील दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. 

Web Title: dipa karmakar wins Gold in Gymnastics World Challenge Cup