राज्य मानांकन टेबल टेनिस : ठाण्याच्या दिपीत पाटीलला जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे : सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरच्या वतीने आयोजित पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अठरा वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद ठाण्याचा अव्वल मानांकित दिपीत पाटीलने विजेतेपद मिळविले. 

प्रभात रोडवरील सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटातील अंतिम लढतीत ठाण्याचा दिपीत पाटीलने आक्रमक खेळ करताना मुंबई उपनगरच्या द्वितीय मानांकित देव श्रॉफचा 11-8, 11-6, 11-7, 11-7 असा सरळ पराभव केला. गेल्या दोन मोसमांत जोरदार कामगिरी करणाऱ्या दिपीत पाटीलचे यंदाच्या मोसमातील हे पहिलेच जेतेपद आहे.

तत्पूर्वी उपांत्य फेरीत दिपीत पाटीलने पुण्याच्या पाचव्या मानांकित गौरव लोहपात्रेवर 11-6, 11-9, 11-5, 13-15, 11-7 असा तर देव श्रॉफने मुंबई उपनगरच्या तिसऱ्या मानांकित ह्रर्षीकेश मल्होत्रावर 14-12, 11-7, 11-9, 12-14, 11-3 असा विजय मिळविला. 

उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या गौरव लोहपात्रेने नागपूरच्या आदी चिटणीसचा 11-7, 7-11, 11-8, 11-4, 11-9 असा, दिपीत पाटीलने पुण्याच्या आठवे मानांकन असलेल्या आर्यन पानसेचा 11-4, 11-7, 11-4, 11-6 असा, मुंबई उपनगरच्या देव श्रॉफने ठाण्याच्या दहाव्या मानांकित साहिल जोशीचा 12-10, 11-6, 11-7, 11-6 असा तर हृषीकेश मल्होत्राने मुंबई उपनगरच्याच आश्‍विन सुब्रमणीयनचा 9-11, 15-13, 12-10, 4-11, 11-7, 11-8 असा पराभव केला होता.

Web Title: Dipeet Patil wins Table Tennis tournament in Pune