जोकोविचची बेकरशी फारकत

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

लंडन : टेनिस क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील खेळाडू नोव्हाक जोकोविच याने प्रशिक्षक बोरिस बेकर यांच्याशी फारकत घेतली आहे. तीन वर्षे ही जोडी एकत्र होती. बेकर यांच्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत जोकोविच याने मोठ्या सहा स्पर्धांत विजेतीपदे मिळविली. गेल्या सहा महिन्यांत मात्र त्याची कामगिरी खालावली होती. अखेर बेकर यांना सोडत असल्याचे जोकोविच याने आज स्पष्ट केले. तो म्हणाला, ""तीन वर्षांनी आम्ही परस्पर सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही.

लंडन : टेनिस क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील खेळाडू नोव्हाक जोकोविच याने प्रशिक्षक बोरिस बेकर यांच्याशी फारकत घेतली आहे. तीन वर्षे ही जोडी एकत्र होती. बेकर यांच्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत जोकोविच याने मोठ्या सहा स्पर्धांत विजेतीपदे मिळविली. गेल्या सहा महिन्यांत मात्र त्याची कामगिरी खालावली होती. अखेर बेकर यांना सोडत असल्याचे जोकोविच याने आज स्पष्ट केले. तो म्हणाला, ""तीन वर्षांनी आम्ही परस्पर सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. जी काही उद्दिष्टे एकत्र ठेवून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता, ती पूर्ण झाली असून, त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.''
 

Web Title: Djokovic Baker separation