दोन शर्यती जिंकून मिक शूमाकरची आघाडी

meek-shoemaker
meek-shoemaker

मनामा (बहारीन) - जर्मनीच्या मीक शूमाकरने एमआरएफ चॅलेंज फॉर्म्युला २००० मालिकेत दोन शर्यती जिंकल्या. याबरोबरच त्याने पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतली. दुसऱ्या शर्यतीत मीकने ज्योई मॉसन आणि राल्फ ॲरॉन यांना मागे टाकले. तिसऱ्या शर्यतीत ॲरॉनने बाजी मारली; पण चौथी शर्यत मीकने जिंकली. मीकचे ७५ गुण झाले. ॲरॉनचे ७२, तर मॉसनचे ६१ गुण झाले. मीक म्हणाला, की ही सुरवात उत्तमच आहे. एकूण कामगिरीबाबत मला आनंद वाटतो. अखेरच्या शर्यतीत जुरी व्हीप्सला मागे टाकणे महत्त्वाचे होते. या सर्किटवर ड्रायव्हिंग करणे आनंददायक ठरले. आता दुबईमध्ये होणाऱ्या पुढील फेरीसाठी मी उत्सुक आहे. दुसरी शर्यत मीकने २० मिनिटे १८.३६५ सेकंद वेळेत जिंकली. तिसऱ्या शर्यतीत तो तिसरा आला. त्याची वेळ २१ मिनिटे २०.४७० सेकंद होती. चौथ्या शर्यतीत त्याची वेळ २० मिनिटे २०.८४३ सेकंद होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com