ड्रॅगफ्लिकर वरुणऐवजी बचावपटू बिरेनची निवड

वरुण कुमार
वरुण कुमार

मुंबई : रशियाविरुद्धची ऑलिंपिक हॉकी पात्रता लढत जेमतेम दोन दिवसांवर असताना भारताचा ड्रॅग फ्लिकर वरुण कुमार जखमी झाला आहे. त्याच्याऐवजी अनुभवी बचावपटू बिरेंदर लाक्रा याची निवड करण्यात आली आहे. भारतीय हॉकी संघ रशियाविरुद्ध 1 आणि 2 नोव्हेंबरला ऑलिंपिक पात्रता लढती खेळणार आहे.

बचावपटू तसेच ड्रॅगफ्लिकरचा खांदा सराव करताना सोमवारी दुखावला. त्याच्या दुखापतीवर उपचार करण्यात आले. पण तो लढतीपूर्वी तंदुरुस्त होणार नाही हे लक्षात आले. आमच्या वैद्यकीय पथकाने वरुणला काही आठवड्यांची विश्रांती आवश्‍यक असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्याऐवजी बदली खेळाडू घेण्याचा निर्णय झाला. बिरेंदर लाक्रा हा भुवनेश्वरची परिस्थिती जाणतो. त्याला 170 लढतींचा अनुभव आहे. त्याचा अनुभव नक्कीच फायदेशीर ठरेल, असे भारतीय संघाचे मार्गदर्शक ग्रॅहम रीड यांनी सांगितले.

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या लढती 1 आणि 2 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता रशियाविरुद्ध होतील. त्यापूर्वी त्याच दिवशी महिला संघ अमेरिेकेविरुद्ध खेळणार आहे. या लढतींना संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com