IPL 2020 चे टायटल स्पॉन्सर आता Dream 11; टाटा, बायजूला मागे टाकून मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

IPL 2020 च्या स्पॉन्सरशिपची घोषणा झाली असून चायनिज कंपनी VIVO च्या जागी आता Dream 11 ला यंदाची टायटल स्पॉन्सरशिप मिळाली आहे.

नवी दिल्ली - IPL 2020 च्या स्पॉन्सरशिपची घोषणा झाली असून चायनिज कंपनी VIVO च्या जागी आता Dream 11 ला यंदाची टायटल स्पॉन्सरशिप मिळाली आहे. Dream 11 ने 222 कोटी रुपयांमध्ये IPL 2020 हंगामाचे स्पॉन्सरशिपचे हक्क खरेदी केले आहेत. VIVO ने स्पॉन्सरशिपसाठी वार्शिक 440 कोटी रुपये मोजले होते. त्यापेक्षा 218 कोटी रुपये कमी देऊन Dream 11 ने हक्क मिळवले आहेत. टायटल प्रायोजकत्वाच्या या शर्यतीत टाटा समूहसुद्धा सहभागी झाला होता. मात्र यामध्ये Dream 11 ने बाजी मारली. यंदाच्या आयपीएलचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईत होणार आहे. 

आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी अनअकॅडमी, टाटा आणि बायजू यांनी भाग घेतला होता. अनअॅकडमीने 210 कोटी रुपयांची बोली लावली होती तर टाटाने 180 कोटी रुपयांची आणि बायजूने 125 कोटी रुपयांची बोली लावली होती. 

क्रीडा विषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने यंदाच्या हंगामातून VIVO कडून स्पॉन्सरशिप काढून घेतली. VIVO ने 2018 ते 2022 पर्यंत 5 वर्षांसाठी 2190 कोटी रुपये मोजून आयपीएलची स्पॉन्सरशिप घेतली होती. पुढच्यावर्षी VIVO पुन्हा परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dream11 wins IPL 2020 title sponsorship for Rs 222 crores

Tags
टॉपिकस
Topic Tags: