दुर्गा देवरेने साधली दुहेरी ‘सुवर्ण’ संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नागपूर - महाराष्ट्राच्या चैत्राली गुजर, पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांना कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या कुमार गटाच्या फेडरेशन ॲथलेटिक्‍स स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदकाची संधी होती. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रविवारी यापैकी केवळ दुर्गा देवरे हिलाच ही संधी साधण्यात यश आले.

यापूर्वी १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविणाऱ्या दुर्गाने आज आठशे मीटर शर्यतीत २ मिनिटे १०.६२ सेकंद वेळ देत बाजी मारली. पहिल्या दिवशी तीन हजार मीटर शर्यत जिंकणाऱ्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदकापासून दूर राहावे लागले. तिला पंजाबच्या सुमन राणीने मागे टाकले. सुमनने १७ मिनिटे ०२.६७ सेकंद अशी वेळ दिली, तर पूनमने १७ मिनिटे ३.३० सेकंद वेळ दिली. विशेष म्हणजे या दोघींनी महाराष्ट्राच्याच संजीवनी जाधव हिचा स्पर्धा विक्रम मोडीत काढला. 

स्पर्धेत १०० मीटर शर्यत जिंकून वेगवान धावपटू ठरलेली चौत्राली गुजर आज दोनशे मीटर शर्यतीत अपयशी ठरली. तिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ही शर्यत महाराष्ट्राच्याच रोसलीन लेवीस हिने २४.९७ सेकंद वेळ देत जिंकली. तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात सोलापूरच्या कोमल जगदाळे हिने सुवर्णपदकाला गवसणी घालताना १० मिनिटे ५५.५८ सेकंद अशी वेळ नोंदवली. याच शर्यतीत नागपूरची ऋतुजा शेंडे चौथी आली. हातोडाफेक प्रकारात आंतरविद्यापीठ स्पर्धेतील विजेती स्नेहा जाधव हिने सुवर्णपदक पटकावले.

Web Title: Durga Deore double gold medal opportunity