भारतीय टेटे महासंघाचे दुष्यंत चौटाला अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - सर्वांत कमी वयात खासदार होण्याचा विक्रम केलेले दुष्यंत चौटाला यांची भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ते भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सर्वांत तरुण अध्यक्ष आहेत.

मुंबई - सर्वांत कमी वयात खासदार होण्याचा विक्रम केलेले दुष्यंत चौटाला यांची भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ते भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सर्वांत तरुण अध्यक्ष आहेत.

हरियानातील गुरुग्राम येथे झालेल्या भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वार्षिक निवडणुकीत सर्वच पदासाठी बिनविरोध निवडणूक झाली. क्रीडा आचारसंहितेचे पालन करणाऱ्या संघटनांत भारतीय टेबल टेनिस महासंघ आघाडीवर आहे. त्यांची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध झाली. नव्या कार्यकारिणीची मुदत चार वर्षांची असेल.

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे कुलदीप वत्स, केंद्रीय क्रीडा खात्याचे प्रतिनिधी अश्विनी कुमार यांच्या उपस्थितीत 28 वर्षीय चौटाला यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तीन मुख्य पदाधिकारी, आठ उपाध्यक्ष, चार संयुक्त सचिव आणि पाच कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती झाली. कार्यकारिणीत महाराष्ट्राचे यतिन टिपणीस आहेत.

नवी कार्यकारिणी - अध्यक्ष - दुष्यंत चौटाला. सचिव - एम. पी. सिंग. खजिनदार - अरुणकुमार बॅनर्जी. उपाध्यक्ष - मिलिंद तोरवणे, एम. एस. सिरसा, चिरंजीव चौधरी, पी. करुणाकरन, व्हेरो न्यून्स, शरद शुक्‍ला, आर. के. परिदा, हरेश संगतानी. सहसचिव - मंटू घोष, जयेश आचार्य, त्रिदीप दुवारा, प्रकाश राजू. कार्यकारिणी सदस्य - यतिन टिपणीस, मनजितसिंग दुआ, एस. हैदर, टी. के. विजय रंगम, अजय शर्मा.

या पूर्वीच्या कार्यकारिणीने चांगले काम केले आहे. ते सुरू ठेवत भारतीय टेबल टेनिसची प्रगती साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व राज्य संघटनांच्या मदतीने खेळाच्या प्रगतीस मदत करण्यास कायम तयार आहोत.
- दुष्यंत चौटाला

Web Title: dushyant chautala chairman tete mahasangha