कर्णधार धोनीला ड्वेन ब्राव्होकडून डान्स ट्रिब्यूट

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

दोन वर्षाच्या बंदीनंतर खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आम्हाला चॅम्पियन का म्हटलं जातं, हे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पुन्हा एकदा दाखवून दिलं. मुंबईतील वानखेडेवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने हैदराबादवर दोन विकेट्सने विजय मिळवत यंदाच्या आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली.

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज संघातील पॉप परफॉर्मर ड्वेन ब्राव्होने अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर खास आपल्या शैलीत कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. ड्वेन ब्राव्होने ड्रेसिंग रुममध्येही सेलिब्रेशन केले आणि सर्वांना या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करुन घेतले. ब्राव्हो महेंद्रसिंह धोनीसमोर डान्स करत असताना धोनी ब्राव्होकडे पाहून केवळ हसत राहिला. एवढेच नाही, तर हरभजन सिंहनेही ब्राव्होला साथ दिली. इतर खेळाडूंही आनंदात सहभागी झाले.

दोन वर्षाच्या बंदीनंतर खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आम्हाला चॅम्पियन का म्हटलं जातं, हे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पुन्हा एकदा दाखवून दिलं. मुंबईतील वानखेडेवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने हैदराबादवर दोन विकेट्सने विजय मिळवत यंदाच्या आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली.

फाफ ड्यू प्लेसिसच्या झुंजार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला. क्लालिफायरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नईपुढे 140 धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत होते. पण फाफने मात्र हार मानली नाही. अखेरच्या षटकापर्यंत तो लढला आणि संघाला विजयाचे तोरण बांधून दिलं. अखेरच्या षटकात दमदार षटकार ठोकत फॅफनेच चेन्नईला दोन विकेट्स राखून विजय मिळवून दिला. फाफने 42 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 67 धावांची दमदार खेळी साकारली. चेन्नईने या विजयासोबतच आपल्या नऊ वर्षांच्या इतिहासात सात वेळा फायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम केला. हैदराबादचा पराभव केल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. 

Web Title: Dwayne Bravo pays 'Dance' tribute to MS Dhoni