IND vs ENG : इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन झाली जाहीर; अँडरसनचे पुनरागमन

England Announce Playing Eleven for Edgbaston Test Against India
England Announce Playing Eleven for Edgbaston Test Against Indiaesakal

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील एजबेस्टन (Edgbaston) कसोटीसाठी इंग्लंडने सामन्याच्या पूर्वसंध्येला प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. भारताच्या गेल्या इंग्लंड दौऱ्यात स्थगित झालेली पाचवी कसोटी 1 जुलै पासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट आणि जेम्स अँडरसन अशी वेगावान फळी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांच्या संघात जॅक लिच हा एकमेव फिरकीपटू आहे. याचबरोबर कर्णधार बेन स्टोक्स देखील वेगवान गोलंदाजी करतो. त्यामुळे इंग्लंड चार वेगवान आणि एक फिरकीपटू असे कॅम्बिनेशिन घेऊन उतरणार आहे.(England Announce Playing Eleven for Edgbaston Test Against India)

England Announce Playing Eleven for Edgbaston Test Against India
'एकच वादा, सूर्या दादा' म्हणत फॅनने मुंबईवरून थेट डब्लिंग गाठले

याचबरोबर नव्याने नियुक्ती झालेला प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमची ही दुसरी मालिका असणार आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडला 3 - 0 असा व्हाईट वॉश दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेबाबत बोलायचे झाले तर ज्यावेळी मालिकेतील 5 वा सामना स्थगित करण्यात आला होता त्यावेळी भारत मालिकेत 2 - 1 असा आघाडीवर होता. मात्र या पाचव्या कसोटी होण्यापूर्वी दोन्ही संघांत अनेक बदल झाले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांचे कर्णधार आणि प्रशिक्षक बदलले आहेत. भारताचा त्यावेळी कर्णधार विराट कोहली होता तर प्रशिक्षक रवी शास्त्री होते. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंड संघातही नेतृत्व बदल झाला आहे. संघाचा कर्णधार आता बेन स्टोक्स असून प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम आहे.

England Announce Playing Eleven for Edgbaston Test Against India
Pakistan Cricket | 'इम्रान खानने पाकिस्तान क्रिकेटचं वाटोळं केलं'

इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन (England Playing Eleven)

झॅक क्राऊली, अॅलेक्स लीस, ऑली पोप, जोर रूट, जोनाथन बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉट्स, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com