भारताचा इंग्लंड दौऱ्याचा शेवटही पराभवानेच

Rishabh Pant, KL Rahul
Rishabh Pant, KL Rahul

लंडन : राहुल आणि पंत यांनी बहारदार शतके ठोकत पाचव्या कसोटीत पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला; पण इंग्लंडने पाचव्या कसोटीत 118 धावांनी मोठा विजय मिळविला. राहुल आणि पंत यांनी शतके काढूनही भारतासाठी दौऱ्याचा शेवट पराभवानेच झाला. 464 धावांच्या आव्हानासमोर भारताचा दुसरा डाव 345 धावांत संपला. इंग्लंडने मालिका 4-1 अशी जिंकली.

दुसऱ्या डावात संथ होत गेलेल्या ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीचा फटका भारताप्रमाणेच इंग्लिश गोलंदाजांनाही बसला. चहापानानंतर रशिदने दोन्ही शतकवीरांना बाद करून विजयाचा मार्ग मोकळा केला. दुसऱ्या नव्या चेंडूवर तळाची फलंदाजी कोलमडली.

अखेरच्या सत्रात रशिदने योजना बदलली. तो "राउंड द विकेट' गोलंदाजांच्या बुटांनी खराब झालेल्या जागेत चेंडू टाकू लागला. माती मोकळी झाली असल्याने चेंडू भसकन वळत होता. 204 धावांची भागीदारी झाल्यावर राहुलला रशिदने बोल्ड केले. दुसऱ्या बाजूने अँडरसन फक्त नेम धरून उजव्या स्टंपबाहेर मारा करत होता. ब्रॉडच्या बरगडीला दुखापत झाल्याने रूट दुसरा नवा चेंडू घ्यायला धजावत नव्हता. पंतलाही रशिदने गुगलीवर चकविले. शतकवीर गेल्याचे दडपण आले.

दुसरा नवा चेंडू घेतल्यावर करनने ईशांत आणि जडेजाला बाद केले. विजयी फटाका लावताना अँडरसनने शमीला बाद केले. याचबरोबर अँडरसनने ग्लेन मॅक्‌ग्राचा 563 बळींचा विक्रम मोडला. आता 564 बळींसह अँडरसन क्रिकेट इतिहासातला सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला. 

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड ः 332 व 8 बाद 423 घोषित विजयी विरुद्ध भारत ः 292 व 94.3 षटकांत सर्वबाद 345 (राहुल 149-348 मिनिटे, 224 चेंडू, 20 चौकार, 1 षटकार, रहाणे 37-106 चेंडू, 5 चौकार, विहारी 0, पंत 114-194 मिनिटे, 146 चेंडू, 15 चौकार, 4 षटकार, जडेजा 13, अँडरसन 3-45, ब्रॉड 1-43, मोईन 1-68, करन 2-23, स्टोक्‍स 1-60, रशीद 2-63)

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
राहुल, रिषभ लढले पण पराभवच पदरी; मालिका 4-1 ने गमाविली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com