विराट कोहलीची वन मॅन आर्मी; इंग्लंडला नाममात्र आघाडी

विराट कोहलीची वन मॅन आर्मी; इंग्लंडला नाममात्र आघाडी

बर्मिंगहॅम : भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवरील दडपण कायम ठेवले. दुसऱ्या दिवशी दुरवस्था झाल्यानंतर जिगरी विराटच्या करारी शतकामुळे भारताने प्रतिआक्रमण रचले. 13 धावांच्या नाममात्र आघाडीनंतर इंग्लंडची एक बाद 9 अशी खराब सुरवात झाली. अश्विनने कूकचा शून्यावर त्रिफळा उडविला. पहिल्या डावातही त्याने ही शिकार केली होती. 

इंग्लंडचा पहिला डाव 287 धावांमध्ये संपवला गेल्यावर धवन आणि विजय या सलामीवीरांनी दिलेल्या अर्धशतकी भागीदारीचा आनंद करनने हिरावून घेतला. सॅम करनने 4 फलंदाजांना बाद करून भारतीय संघाला हादरवून सोडले. आजूबाजूला पडझड होत असताना विराटने झुंजार शतक ठोकून भारताला 274 धावा उभारायला मदत केली. पहिल्या डावात इंग्लंडला 13 धावांची आघाडी मिळाली. 2014 च्या दौऱ्यातील 5 सामन्यात 134 धावाच जमा करू शकणाऱ्या विराट कोहलीने 2018 च्या पहिल्याच सामन्यात 149 धावांची खेळी उभारून टीकाकारांना गप्प केले. 

5 बाद 100 धावसंख्येवरून विराटला पंड्याने साथ दिली. आज प्रेक्षकांना कोहली - अँडरसन मधील क्रिकेट द्वंद्व अनुभवायला मिळाले. गेल्या दौऱ्यात अँडरसनने विराटला चार वेळा बाद केले होते. नेहमी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या कोहलीला अँडरसनने टाकलेल्या 72% चेंडूवर धाव काढता आली नाही. विराटला त्याच्या कष्टाचे फळ शतक पूर्ण करून मिळाले. मैदानावरच्या सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत विराटला मानवंदना दिली. तळातल्या तीन फलंदाजांना हाताशी घेऊन विराटने 105 धावांची भर टाकल्याने इंग्लंडला मिळणारी आघाडी कमी झाली. शेवटच्या विकेटकरिता विराटने 57 धावा जोडल्या ज्यात उमेश यादवचा वाट एक धावेचा होता ह्यावरून विराटने काय कमाल केली ह्याचा अंदाज लागू शकतो. 

धावफलक 
इंग्लंड : पहिला डाव ः 89.4 षटकांत सर्व बाद 287 (किटॉन जेनिंग्ज 42, ज्यो रूट 80, जॉनी बेअरस्टॉ 70, बेन स्टोक्‍स 21, सॅम करन 24, उमेश यादव 1-56, इशांत 1-46, अश्विन 26-7-62-4, महंमद शमी 19.4-2-64-3) 

भारत : पहिला डाव ः विजय पायचीत गो. करन 20, धवन झे. मलान गो. करन 26, राहुल त्रि. गो. करन 4, विराट झे. ब्रॉड गो. रशीद 149-225 चेंडू, 22 चौकार, 1 षटकार, स्ट्राईकरेट 66.22, रहाणे झे. जेनिंग्ज गो. स्टोक्‍स 15, कार्तिक त्रि. गो. स्टोक्‍स 0, हार्दिक पंड्या पायचीत गो. करन 22, अश्विन त्रि. गो. अँडरसन 10, शमी झे. मलान गो. अँडरसन 2, इशांत पायचीत गो. रशीद 5, उमेश नाबाद 1, अवांतर 20, एकूण 76 षटकांत सर्व बाद 274 
बाद क्रम ः 1-50, 2-54, 3-59, 4-100, 5-100, 6-148, 7-169, 8-182, 9-217 
गोलंदाजी ः अँडरसन 22-7-41-2, ब्रॉड 10-2-40-0, करन 17-1-74-4, रशीद 8-0-31-2, स्टोक्‍स 19-4-73-2) 

इंग्लंड : दुसरा डाव ः कुक त्रि. गो. अश्विन 0, जेनिंग्ज खेळत आहे 5, अवांतर 4, एकूण 3.4 षटकांत 1 बाद 9 
बाद क्रम ः 1-9 
गोलंदाजी ः शमी 2-2-0-0, अश्विन 1.4-0-5-1 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com