विराट कोहलीवर इंग्लंडचे दडपणास्त्र

पीटीआय
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

बर्मिंगहॅम - भारताच्या इतर फलंदाज दडपणाखाली असून, याचे विराट कोहलीवर दडपण येईल, अशी शाब्दिक खेळी इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅव्हल बेलिस यांनी केली आहे. लॉर्डसवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर इंग्लंडने विराटला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात विराट ‘वन मॅन आर्मी’प्रमाणे एकाकी लढला. इतर कोणत्याही फलंदाजांकडून त्याला साथ मिळाली नाही. इंग्लंडने भारतीय संघाची ही दुखरी नस चांगलीच ओळखली असून, त्याचा फायदा घेण्यासाठी विराटवर दडपण वाढवण्यासाठी शाब्दिक फटकेबाजी केली आहे.

बेलिस यांनी एकीकडे विराटचे कौतुकही केले, विराट सध्या तरी क्रिकेटविश्‍वातला सर्वोत्तम फलंदाज झाला नसला, तरी तो लवकरच हा बहुमान मिळवेल. त्याने पहिल्या कसोटीत केलेली फलंदाजी फारच उच्च श्रेणीची होती; परंतु जर आम्ही भारताच्या इतर फलंदाजांवर दडपण वाढवले, तर त्याचा परिणाम विराटवर होईल, असे सांगण्याची चलाखी बेलिस यांनी केली. पण, त्यांनी आपल्या संघाचीही वास्तवता मांडली. आमच्या संघातही फार वेगळे चित्र नाही. आमच्याही संघातील काही फलंदाज ज्यो रूट आणि जॉन बेअरस्टॉवरचे दडपण वाढवत आहेत, असे ते म्हणाले.

पहिल्या कसोटीत दोन्ही बाजूने फलंदाज बाद होत होते. कोहलीही सुरवातीला अडखळत होता. फलंदाजी करणे कठीण होते, असे सांगून बेलिस म्हणाले, की भारतीय फलंदाज पहिल्या कसोटीत केलेल्या चुकांतून निश्‍चितच सुधारणा करतील. त्यांच्याकडे काही चांगले फलंदाज आहेत, परंतु स्विंग होणाऱ्या चेंडूवर त्यांची त्रेधा उडत होती. भारतात आम्ही जसा फिरकी गोलंदाजी खेळण्याचा सराव करतो तसे भारतीय फलंदाज येथे स्विंग होणाऱ्या चेंडूचा कसा सामना करायचा, याचा अभ्यास करतील.

इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी मलान आणि खटल्याठी बेन स्टोक्‍स्‌ला वगळले आहे. मलानऐवजी पोपला संधी देण्यात आली. त्यामुळे इंग्लंड संघात आणखी एक डावखुरा फलंदाज आला आहे. ऑफस्पिनर अश्‍विनसाठी ही आनंदाची बाब असेल. लॉर्डसवर दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम संघ निवडताना आम्ही याचा फार विचार करणार नसल्याचे बायलिस यांनी सांगितले.

लॉर्ड्‌स, पोप  आणि पुजारा
शाब्दिक कोटी करून अफलातून ट्विट करण्यात वाक्‌बगार असलेल्या वीरेंद्र सेहवागने लॉर्डस, पोप आणि पुजारा यांचे संदर्भ जोडून ‘आता सर्व लॉर्डसवर घडणार आहे. इंग्लंडकडून पोप खेळण्याची शक्‍यता आहे, भारत पुजाराला संधी देईल का?’ असे ट्विट केले आहे.

Web Title: England pressure on Virat Kohli