इंग्लंड-द.आफ्रिका सलामीची लढत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कोलकता, ता. २६ - पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेला इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याने सुरवात होईल. हा सामना ३० मे रोजी ओव्हलवर होईल. अंतिम सामना १४ जुलैस लॉर्डसवर खेळविण्यात येईल.  

ऑस्ट्रेलिया विजेतेपद टिकविण्याच्या मोहिमेस १ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुरवात करेल. माजी विजेते  पाकिस्तानची सलामी वेस्ट इंडिजसी (३१ मे २०१९) होईल. भारताचा पहिला सामना ५ जून २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल. पारंपिरक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना १६ जून रोजी ओल्ड ट्रॅफर्डवर होईल. 

भारताचे सामने
५ जून     -     वि. द.आफ्रिका
९ जून     -     वि. ऑस्ट्रेलिया
१३ जून     -     वि. न्यूझीलंड
१६ जून     -     वि. पाकिस्तान
२२ जून     -     वि. अफगाणिस्तान
२७ जून     -     वि. वेस्ट इंडीज
३० जून     -     वि. इंग्लंड
२ जुलै     -     वि. बांगलादेश
६ जुलै     -     वि. श्रीलंका

Web Title: England-South Africa Opening match