Ben Stokes : राजस्थानचा स्टोक्स IPL खेळण्याबाबत म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

England Test Team Captain Ben Stokes Statement About Playing IPL 2023

Ben Stokes : राजस्थानचा स्टोक्स IPL खेळण्याबाबत म्हणाला...

Ben Stokes IPL 2023 : जागतिक क्रिकेटमध्ये टी 20 क्रिकेट लीगचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे अनेक दर्जेदार क्रिकेटपटूंनी आपली प्राथमिकता बदलली आहे. अनेक क्रिकेटपटूंना तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळणे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शक्य होत नाहीये. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू एक क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेणे पसंत करत आहेत. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने देखील नुकताच वनडे क्रिकेटला राम राम ठोकला. यावेळी त्याने माझ्या दृष्टीने कसोटी क्रिकेट खेळणे फार महत्वाचे आहे असे सांगितले. (Ben Stokes Statement About Playing IPL 2023)

हेही वाचा: Asia Cup 2022 : भारत मुंबईतून तर पाकिस्तान अ‍ॅमस्टरडॅममधून दुबईसाठी रवाना

दरम्यान, बेन स्टोक्सने आपली डॉक्युमेंटरी सिरीज 'बेन स्टोक्स : फिनिक्स फ्रॉम द अॅशेस' निमित्ताने एका वर्च्युअल कार्यक्रमात आयपीएल खेळण्याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'हा विषय क्रिकेट कार्यक्रमावर अवलंबून आहे. आम्हाला बघावे लागेल की पुढचा कार्यक्रम कसा आहे. मात्र मी स्पष्ट करू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटला माझे सर्वस्व देणार आहे. त्यामुळे माझे सर्व निर्णय हे कसोटी सामन्यांच्या कार्यक्रमावरच अवलंबून आहेत. आता मी कर्णधार आहे त्यामुळे असं करणं माझी जबाबदारी आहे.'

बेन स्टोक्सने आतापर्यंत 84 कसोटी सामन्यात 5 हजार 320 धावा केल्या आहेत आणि 185 विकेट घेतल्या आहेत. बेन स्टोक्सने जरी कसोटीला प्राधान्य दिले असले तरी तो आयपीएलला एक जबदस्त स्पर्धा म्हणून संबोधतो. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमातून वेळ मिळाला तर तो आयपीएल खेळणार आहे असे म्हणतो.

हेही वाचा: Vinod Kambli : कांबळीला मराठमोळ्या उद्योजकाने दिलेल्या नोकरीच्या ऑफरचं पुढं काय झालं?

स्टोक्स म्हणाला की, 'मी चार वर्षे आयपीएल हंगाम खेळलो आहे. ज्या ज्या वेळी मला आयपीएल खेळण्याची संधी मिळते त्या त्या वेळी मला खूप चांगल वाटतं. आयपीएल एक जबरदस्त स्पर्धा आहे. या स्पर्धेत तुम्हाला खेळायला मिळंत म्हणूनच नाही तर या स्पर्धेत तुम्हाला जगभरातील सर्वश्रेष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत खेळण्याची संधी मिळते म्हणूनही ही आयपीएल जबरदस्त आहे.'

स्टोक्स पुढे म्हणाला की, 'या स्पर्धेचा भाग होणं अद्भुत आहे. मात्र आयपीएलच्यावेळी इतर कोणता कार्यक्रम आहे का हे देखील पहावे लागले. इंग्लंडचा खेळाडू असल्याने आमचा कसोटी कार्यक्रम खूप मोठा असतो. आम्ही वर्षभर क्रिकेट खेळत असतो.'

Web Title: England Test Team Captain Ben Stokes Statement About Playing Ipl 2023

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..