इंग्लंडवारीपूर्वी सूर्या-पृथ्वीचा कोरोना रिपोर्ट आला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूके सरकारने भारत आणि श्रीलंकाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी रेड अलर्ट जारी केलाय.
Suryakumar Yadav and Prithvi Shaw
Suryakumar Yadav and Prithvi Shaw E Sakal

England vs India Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shwa)आणि सूर्यकुमार (Surya Kumar Yadav) यादव या मुंबईकर जोडगोळीचा संघात समावेश करण्यात आलाय. धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या दोघांच्या कोरोना टेस्ट झाली असून त्याचे रिपोर्टही आले आहेत. दोघांच्या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या असून इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय. पुढील 24 तासांत ही जोडी इंग्लंडला रवाना होईल.

इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी शुभमन गिल आणि वाशिंग्टन सुंदर यांना दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागलीये. या दोघांच्या जागी बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना संधी दिलीये. प्रवासातील आवश्यक त्या खबरदारीसह बीसीसीआय या दोन खेळाडूंना इंग्लंडला रवाना करणार आहे.

Suryakumar Yadav and Prithvi Shaw
सिंधूला अलिशान कार द्या; आनंद महिंद्रा यांनी दिला खास रिप्लाय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूके सरकारने भारत आणि श्रीलंकाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. त्यामुळे या दोन खेळाडूंच्या इंग्लंड दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. परंतु योग्यवेळी बीसीसीआयने या प्रकरणात हस्तक्षेप करत हा अडथळा दूर केलाय. बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबतच्या चर्चेनंतर या दोघांना इंग्लंड दौऱ्यावर येण्याची परवानगी मिळाली आहे. इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर त्यांना क्वारंटाईनला सामोरे जावे लागणार आहे.

Suryakumar Yadav and Prithvi Shaw
विराट सेनेच्या पाहुणचारासाठी 'हिरवे हिरवे गार गालिचे...'

सूर्य कुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी ते संघाचा भाग नसतील. श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला होता. यात क्रुणाल पांड्यासह युजवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना श्रीलंकेतच थांबावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com