esakal | ENG W vs IND W T20 : डकवर्थ लुईसमुळं कॅलक्युलेशन बिघडलं
sakal

बोलून बातमी शोधा

England Women vs India Women

ENG W vs IND W T20 : डकवर्थ लुईसमुळं कॅलक्युलेशन बिघडलं

sakal_logo
By
सुशांत जाधव

ENG-W vs IND-W 1st T20 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यातील पावसाच्या व्यत्ययानंतर इंग्लंड महिला संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार, 18 धावांनी विजयी घोषीत करण्यात आले. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना नॅटली स्कायवर 55 (27) आणि अ‍ॅमी एलेन जोन्स 47 (27) यांच्या तडाखेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 177 धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. ब्रंट हिने सलामीची स्फोटक फलंदाज शफाली वर्मा हिला दुसऱ्या चेंडूवर शून्यावरच माघारी धाडले. स्मृती मानधनाने हरलीनच्या साथीन संघाचा डाव सावरला. दोघींनी पहिल्या दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. ही जोडी नॅटली स्कायवर हिने फोडली. स्मृती मानधना 17 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 29 धावांची भर घालून माघारी परतली. हरमनप्रीत कौर पुन्हा अपयशी ठरली. तिला संघाच्या धावसंख्येत अवघ्या एका धावेची भर घालता आली. हरलीन देओल 17 (24) आणि दीप्ती शर्मा 4 (7) धावांवर नाबाद खेळत असताना पावासामुळे खेळात व्यत्यय आला.

हेही वाचा: VIDEO : हमारी छोरियां छोरो से कम है के; हरलीनचा कॅच बघाच!

खेळ थांबला त्यावेळी भारतीय महिला संघाने 8.4 षटकात 3 विकेट गमावून 54 धावा केल्या होत्या. इंग्लंड महिला संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 18 धावांनी विजयी घोषीत करण्यात आले. या विजयासह इंग्लंड महिला संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा: Wimbledon : जोकोविचची पाऊले चालती मोठ्या रिंगणाची वाट!

तत्पूर्वी टॅमी ब्यूमॉन्ट आणि डॅनियल वॅट या जोडीने इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. राधा यादव हिने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. तिने डॅनियल वॅटला 31 (28) विकेटमागे रिचा घोष करवी झेलबाद केले. त्यानंतर पूनम यादवने टॅमी ब्यूमॉन्ट 18 (22) हिला चालते केले. दीप्ती आणि रिचा घोष या दोघींनी इंग्लंडची कर्णधार हेदर नाईट हिला अवघ्या 6 धावांवर रन आउट करत तंबूत धाडले. नॅटली स्कायवर आणि अ‍ॅमी एलेन जोन्स या दोघींनी 78 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. 19 व्या षटकात शिखा पांड्येनं नॅटली स्कायवर 55 (27), अ‍ॅमी 43 (27) आणि सोफिया 1(2) यांची विकेट घेतली. ब्रंट शेवटच्या चेंडूवर धावबाद झाली. इंग्लंडच्या महिला संघाने निर्धारित 20 षटकात धावफलकावर 7 बाद 177 धावा लावल्या होत्या.

loading image