Ashes 2019 :  सलामीवीर बर्न्सच्या शतकाने इंग्लंड वरचढ

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

सलामीवीर रॉरी बर्न्स याने ॲशेस पदार्पणात शतक ठोकले. त्यामुळे पहिल्या ॲशेस कसोटीत इंग्लंडची स्थिती भक्कम झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नियंत्रीत मारा करूनही विकेटसाठी झगडावे लागले.

बर्मिंगहॅम - सलामीवीर रॉरी बर्न्स याने ॲशेस पदार्पणात शतक ठोकले. त्यामुळे पहिल्या ॲशेस कसोटीत इंग्लंडची स्थिती भक्कम झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नियंत्रीत मारा करूनही विकेटसाठी झगडावे लागले.

दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ४ बाद २६८ धावा झाल्या होत्या. ते आणखी केवळ १७ धावांनी मागे असून सहा विकेट बाकी आहेत. बर्न्स १२५, तर स्टोक्‍स ३६ धावांवर नाबाद होते. दोन वेळा ‘रिव्ह्यू’मुळे बचावलेल्या रूटला बर्न्सने मोलाची साथ दिली. चहापानाला इंग्लंडने २ बाद १७० धावा केल्या होत्या. बर्न्स ८२ तर डेन्ली ९ धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाचा डाव २८४ धावांत संपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर बिनबाद १० धावा केल्या होत्या. आज जेम्स पॅट्टीसन याने पाचव्या षटकात जेसन रॉयला (१०) बाद केले. 

रूट हा पॅट्टीसनच्या चेंडूवर बचावला. तो चकल्यानंतर चेंडू स्टम्पला लागून बेल्स उडाल्या; पण त्या खाली पडल्या नाहीत. पंचांनी रूटला यष्टीमागे झेलबाद ठरविले. रूटने ‘रिव्ह्यू’ घेतला तेव्हा चेंडू बॅटला अजिबात लागला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाकिस्तानच्या आलिम दर यांच्या विरोधात कौल गेला. तेव्हा रूटला पीटर सीड्‌लच्या चेंडूवर पायचीत ठरविण्यात आले होते. तेव्हा रूट १४ धावांवर होता. रूट-बर्न्स यांनी १३२ धावांची भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक ः
ऑस्ट्रेलिया ः पहिला डाव ः २८४ इंग्लंड ः पहिला डाव ः ९० षटकांत ४ बाद २६७ (रॉरी बर्न्स खेळत आहे १२५-२८२ चेंडू, १६ चौकार, जेसन रॉय १०, ज्यो रुट ५७-११९ चेंड़ू, ६ चौकार, ज्यो डेन्ली १८, जॉस बटलर ५, बेन स्टोक्‍स खेळत आहे ३७, पॅट कमिन्स १-६५, जेम्स पॅट्टीसन२-५४, पीटर सीड्‌ल १-४३, नेथन लायन २७-४-७८-०)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EngvsAus first Test Match at Birmingham