सराव सामन्यांमुळे तयारीला वाव - मॉर्गन

पीटीआय
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - कसोटी मालिकेनंतर आता तीन एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघ भारतात दाखल झाला आहे. झटपट क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरवात होण्यापूर्वी होणाऱ्या दोन सराव सामन्यांमुळे सरावाला चांगला वाव मिळेल, असे मत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने व्यक्त केले. 

इंग्लंड आणि भारतीय ‘अ’ संघांदरम्यान उद्या पहिला सराव सामना होत आहे. कसोटी मालिकेत इंग्लंडला सपशेल पराभव पत्करावा लागला होता. आता एकदिवसीय मालिकेबाबत काय नियोजन असेल, असे विचारले असता मॉर्गन म्हणाला, ‘‘सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी भारतासारखे दुसरे ठिकाण नाही. भारतीय संघ नेहमीच आव्हानात्मक वाटत आला आहे. त्यातही मायदेशात खेळताना त्यांचा खेळ अधिक बहरतो. त्यामुळे एकदिवसीय मालिकेसाठी आम्ही उत्सुक आहोत. या मालिकेला सुरवात होण्यापूर्वी होणारे दोन सराव सामने आम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्यास पुरेसे आहेत. मॅच प्रॅक्‍टिससाठी हे सामने आमच्यासाठी महत्त्वाचे असतील.’’

भारतीय संघ उर्वरित मोसमात जसे सर्वाधिक कसोटी सामने खेळणार आहे, त्याचप्रमाणे इंग्लंड संघ चॅंपियन्स करंडक स्पर्धेपर्यंत सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणार आहे. मॉर्गन म्हणाला, ‘‘आगामी सहा महिने आम्ही फक्‍त पांढऱ्या चेंडूवरच खेळ करणार आहोत. भरगच्च क्रिकेट कार्यक्रम आहे. त्यामुळेच सर्वोत्तम भारतीय संघाविरुद्धची मालिका आमच्यासाठी महत्त्वाची ठरते. भविष्याची झटपट क्रिकेटचा कार्यक्रम लक्षात घेता आम्हाला त्याची सकारात्मक सुरवात या मालिकेपासून करायची आहे.’’

मॉर्गनने या वेळी ज्यो रूट गुरवारपर्यंत (ता. १२) भारतात दाखल होईल. पुण्यातील सामन्यासाठी तो उपलब्ध असेल, असेही मॉर्गनने स्पष्ट केले.

Web Title: eoin morgan