World Cup 2019 : इंग्लंडच्या कर्णधारालाच माहीत नाही त्याचा संघ.. हे कसे जिंकणार वर्ल्ड कप?

ENG_Morgan
ENG_Morgan

वर्ल्ड कप 2019 : लीड्‌स (इंग्लंड) : इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धची मालिका 4-0 अशी सहज जिंकली असली, तरी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय अंतिम संघ काय असेल, याबाबत कर्णधार इयॉन मॉर्गन अजूनही अनभिज्ञ आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत निवडले जाणारे अंतिम 15 खेळाडू कोण असतील याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, असे त्याने सांगितले. 

पाकिस्तानविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड निवड समितीने प्रत्येक सामन्यात काही प्रयोग केले. मात्र, प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळात कमालीची प्रगती दाखविल्यामुळे अंतिम संघ निवड करताना निवड समितीसमोर आव्हान असेल असे मॉर्गनने सांगितले. 

मॉर्गन संघ रचनेबद्दल म्हणाला, "मी काय सांगणार ? खेळाडूंच्या कामगिरीमुळे निवड समितीचे काम नक्की कठिण झाले आहे. पाकिस्तानविरुद्ध या खेळाडूंनी केलेली कामगिरी निश्‍चितच अभिमानास्पद आहे. प्रत्येक खेळाडूचा खेळ उंचावलेला आहे. त्यामुळे आता दुखापती किंवा आजारपणच खेळाडूंच्या निवडीचा निकष ठरू शकेल अशी वेळ आली आहे.'' 

अंतिम पंधरा खेळाडू माहित नसले, तरी मॉर्गनच्या बोलण्यात अंतिम पंधरा हे शब्द सातत्याने येत होते. पाकिस्तानविरुद्ध जवळपास प्रत्येक खेळाडूने अंतिम पंधरासाठी आपली योग्यता दाखवून दिली आहे, असे म्हणून मॉर्गन म्हणाला,""प्रत्येक खेळाडूने संधी मिळाल्यावर आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. आता प्रत्येकाला निवड समितीच्या त्या "कॉल'ची प्रतिक्षा असेल. त्यामुळे तुमची संघात निवड होणार असे कुणी सांगितले, तरी जोपर्यंत निवड समितीचा फोन येत नाही, तोवर खेळाडू त्यावर विश्‍वास ठेवणार नाही. खेळाडूंची ही प्रतिक्षा कदाचित उद्या संपू शकेल.'' 
 
अंतिम पंधरा जणांची निवड उद्या ? 
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडकडून संधी मिळालेल्या प्रत्येकाची कामगिरी चांगली झाली आहे. या मालिकेतील कामगिरीच अंतिम संघ निवडीसाठी ग्राह्य ठरली जाणार असली, तरी जोफ्रा आर्चरविषयीच्या निवडीकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. इंग्लंड उद्या मंगळवारी आपला पंधरा सदस्यीय संघ जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com