World Cup 2019 : मॉर्गन म्हणतो अल्लाह आमच्या सोबत

वृत्तसंस्था
Monday, 15 July 2019

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आणि वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनने आम्हाला अल्लाहचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य केले. 

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आणि वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनने आम्हाला अल्लाहचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य केले. 
 
''न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बऱ्याचवेळी सामना हाताबाहेर गेला, केन विल्यम्सनशी लढताना तुझ्या डोक्यात काय विचार होते? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ''मी आदिल रशीदशी बोललो होतो. तो म्हणाला अल्लाह आपल्या सोबत आहे.''

अखंड डावातील बरोबरी त्यानंतर सुपर ओव्हरमधीलही बरोबरी एवढ्या प्रमाणात श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्याचा निकाल कोणी जास्त चौकार मारले त्यावर लागला आणि इंग्लंडने यात बाजी मारून प्रथमच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतपद मिळवले. शेवटी जो जिता वो सिकंदर इंग्लंडच ठरले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eoin Morgan says we had Allah with us