भारताचे न्यूझीलंडसमोर 338 धावांचे आव्हान; विराट, रोहितचा डबल बार

वृत्तसंस्था
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर शिखर धवन अवघ्या 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने रोहीत शर्माच्या मदतीने चांगला खेळ केला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 230 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 138 चेंडूत 147 धावा केल्या.

कानपूर- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिेकेट सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 50 षटकांत 337 धावांचा डोंगर उभा केला. 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर शिखर धवन अवघ्या 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने रोहीत शर्माच्या मदतीने चांगला खेळ केला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 230 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 138 चेंडूत 147 धावा केल्या. 42 व्या षटकात रोहित शर्माला मिचेल सँटनरने बाद केले. विराट कोहलीने 106 चेंडूत 113 धावा करत एकदिवसीय कारकिर्दितील 32 वे शतक झळकावले. न्यूझीलंडचा गोलंदाज साऊदीने विराटला 113 धावांवर बाद केले. विराट आणि रोहीत बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या (8), महेंद्रसिंग धोनी (25), केदार जाधव (18) तर दिनेश कार्तिकने (4) धावा करत न्यूझीलंडसमोर 338 धावांचे लक्ष्य ठेवले.   

Web Title: esakal news ind vs Nz 3rd ODI