अनुभवी प्रशासकांची उणीव संघटनांना भासणार? 

पीटीआय
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई / नवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींमुळे क्रिकेट संघटनांना काही वर्षांत अनुभवी प्रशासकांची उणीव प्रकर्षाने भासणार असल्याचे क्रिकेट प्रशासक सांगत आहेत. अनेक संघटनांतील पदाधिकारी काही वर्षांत पदावर राहण्यास अपात्र होतील आणि प्रश्‍न बिकट होतील, अशीही भीती व्यक्त होत आहे. 

अनेक संघटनांतील पदाधिकारी यापूर्वीच अपात्र ठरले आहेत, तर काही पदाधिकारी काही वर्षांत अपात्र ठरतील. क्रिकेट संघटनांना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. उच्चस्तरीय चर्चेच्या वेळी अनुभवी प्रशासक महत्त्वाचे ठरतात, याबाबत बहुतेकांचे एकमत आहे. अनेक पदाधिकारी विविध स्पर्धांचे आयोजन हेच खडतर आव्हान असते, त्यातील प्रश्‍न सोडवण्यास, तसेच आणि स्टेडियम, मैदानांची निगा राखण्यासाठीही अनुभव मोलाचा ठरतो, असे सांगत आहेत. वयोगटाच्या स्पर्धा असतातच, त्याचबरोबर कोणते प्रश्‍न कोणत्या ठिकाणी येऊ शकतील याचा विचार करून कार्यक्रम तयार करावा लागतो, असे सांगितले जात आहे. 

केवळ कार्यक्रम तयार करून पुरेसे काम होत नाही, त्यासाठी पंच, तसेच सहायक पदाधिकारीही नियुक्त करावे लागतात. हेच प्रश्‍न भारतीय क्रिकेट मंडळासमोरही असतात. तिथे तर विविध मंडळांचे पदाधिकारी, तसेच आयसीसीबरोबर चर्चा करताना भारताचे हित जपण्याकडे लक्ष द्यावे लागते. जगमोहन दालमिया, आय. एस. बिंद्रा यांनी अनुभवाच्या जोरावरच भारतात स्पर्धांचे आयोजन केले, तसेच दूरचित्रवाणी हक्क दूरदर्शनऐवजी खासगी प्रक्षेपकांना दिले. मात्र, ही परिस्थिती या अनुभवी पदाधिकाऱ्यांनी अधिकारात अमर्यादित वाढ करूनच निर्माण केली आहे, हेही मान्य केले जात आहे.

Web Title: Experienced administrators would lack the organizations