प्रसिद्ध सीरिज 'FRIENDS' मधील 'या' कलाकाराचे निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

मूळचे न्यूयॉर्कचे असलेल्या रॉन यांना 1979मध्ये ऍमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या 'काज' या प्रसिद्ध सीरीजसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. 

न्यूयॉर्क : प्रसिद्ध टिव्ही मालिका फ्रेण्ड्समधील अभिनेत्री जेनिफर एनिस्टनची भूमिका असलेल्या रेचल ग्रीनच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या रॉन लीबमैन यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्यांचे काल (शुक्रवारी) निधन झाले. 

Image result for ron leibman

मूळचे न्यूयॉर्कचे असलेल्या रॉन यांना 1979मध्ये ऍमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या 'काज' या प्रसिद्ध सीरिजसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. 

त्यांनी 1993मध्ये टोनी कुशनरच्या 'एंजल्स ऑफ अमेरिका' या नाटकासाठी त्यांना टोनी अवॉर्ड मिळाला होता. त्यांनी 1956मध्ये मनोरंजन क्षेत्रात कामाला सुरवात केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous series Friends actor Ron Leibman passes away at 82