सर्फराजला फॅन म्हणाला, ढेरपोट्या

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

पाकिस्तानी चाहत्याकडूनच अशी आलोचना होत असल्याचे दिसल्यानंतर या चाहत्याने माफी मागितली आहे. मन्सूर असे या चाहत्याचे नाव आहे. मी पाकिस्तानी कर्णधाराला काही सांगू इच्छितो होतो, पण ते बरोबर नव्हते. त्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो. मी हा व्हिडिओ शेअर केलेला नाही. 

लंडन : भारताकडून मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याला पाकिस्तानी चाहत्याने चक्क ढेरपोट्या म्हटल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अखेर या चाहत्याने सर्फराजची माफी मागितली आहे.

पाकिस्तानला भारताकडून विश्वकरंडकात 89 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात सर्फराज जांभई देताना दिसून आला होता. त्यावर त्याची आलोचना होत असतानाच आता त्याच्या शरीरावरूनही त्याला ट्रोल करण्यात येत आहे. लंडनमध्ये आपल्या कुटुंबीयांसाह मार्केटमध्ये असताना, एका पाकिस्तानी चाहत्याने त्याला 'आप सुवर जैसे मोटे क्यू हो गये हो, डायट किया करो' असे म्हटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी चाहत्याकडूनच अशी आलोचना होत असल्याचे दिसल्यानंतर या चाहत्याने माफी मागितली आहे. मन्सूर असे या चाहत्याचे नाव आहे. मी पाकिस्तानी कर्णधाराला काही सांगू इच्छितो होतो, पण ते बरोबर नव्हते. त्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो. मी हा व्हिडिओ शेअर केलेला नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fan issues an apology to Sarfaraz Ahmed after harassing him in UK mall