सेल्फीसाठी आलेल्या ग्राउंड्समन सोबत ऋतुराजचं वागणं नेटकऱ्यांना खटकलं, Video व्हायरल

डगआउटमध्ये बसलेल्या ऋतुराज गायकवाडने केलेले कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwadesakal

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी२० मालिका रोमांचक घडीवर होती. मात्र रविवारी (१९ जून) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अखेरचा टी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला, जो निर्णायक होता. पावसामुळे केवळ ३.३ षटकांचा खेळ होऊ शकला. दरम्यान, डगआउटमध्ये बसलेल्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) केलेले कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावरल व्हायरल होत आहे.

Ruturaj Gaikwad
‘त्याला वजनामुळे खाली वाकता येत नाही...पंतवर पाकिस्तानच्या खेळाडूची टीका

पावसादरम्यान, ग्राउंड्समन डगआऊटमध्ये बसलेल्या ऋतुराज गायकवाडजवळ सेल्फी घेण्यासाठी गेला, मात्र ऋतुराजने ग्राउंड्समनला सेल्फी घेण्यास नकार दिला. त्याच्या या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी ऋतुराजचा निषेध करत आहेत.

खरतरं, मैदानावर क्रिकेटपटूंना मोबाईल घेऊन जाण्यास मनाई आहे, पण पावसात मैदानावरील व्यक्तीजवळ फोन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गायकवाड आणि ग्राउंड्स मॅनच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर चाहते संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

ऋतुराज या सामन्यात काही विशेष करू शकला नाही. तो केवळ 10 धावा करून एनगिडीच्या चेंडूवर बाद झाला. याशिवाय 15 धावांवर ईशान किशनला एनगिडीने बोल्ड केले.

Ruturaj Gaikwad
आर्थिक संकट : पेट्रोल पंपावर चहा देताना दिसला श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी२० मालिका रोमांचक घडीवर होती. मात्र रविवारी (१९ जून) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अखेरचा टी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला, जो निर्णायक होता. पावसामुळे केवळ ३.३ षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये भारतीय संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर २८ धावा केल्या. त्यानंतर पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आला आणि मालिका २-२ ने बरोबरीत सुटली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com