VIDEO : अप्रतिम झेल घेतल्यावर नाचला अन् मग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Funny Moments in Cricket

VIDEO : अप्रतिम झेल घेतल्यावर नाचला अन् मग...

Funny Moments in Cricket : क्रिकेटच्या मैदानातील अनेक किस्से घडत असतात. कधी खेळाडू अफलातून झेलमुळे चर्चेत येतो. तर कधी फलंदाजाची फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करुन जाते. काही वेळा मैदानात असं काही घडतं की ज्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू अनावर होते. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका खेळाडूनं सुदर कॅच घेतला. त्यानंतर त्याने अनोखे सेलिब्रेशनही केले. पण त्यानंतर जे काही घडलं ते क्रिकेट चाहत्यांना हसवून सोडणारे होते.

युरोपीय क्रिकेट लीग (European Cricket League) T10 स्पर्धेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्पर्धेतील ब्रेशिया क्रिकेट क्लब आणि तुर्की जेटिनबर्नु जफर यांच्यात क गटातील सामना सुरु होता. स्पेनच्या कार्टामा ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात एक गंमतीशीर प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.

या दोन्ही संघातील सामन्यादरम्यानं क्षेतरक्षकाणे सीमारेषवर एक सुंदर झेल टिपला. त्याने अनोख्या शैलीत आनंदही साजरा केला. हे सगळ झाल्यावर त्याला आपण मोठी चूक केल्याचे लक्षात आले. त्याने रागाने चेंडू जमीनीवर फेकून देत नाराजीही व्यक्त केली. त्याचे हे कृत्य पाहून नेटकऱ्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.